घरमुंबईBreaking : गोपाळकालानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरांतील सरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

Breaking : गोपाळकालानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरांतील सरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

Subscribe

दहीहंडी उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरतात. त्यामुळेच आता दहीहंडीनिमित्त उद्या गुरुवारी (ता. 07 सप्टेंबर) मुंबई प्रदेश महानगर क्षेत्रापैकी मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आहे.

मुंबई : मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होते. दहीहंडी उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरतात. त्यामुळेच आता दहीहंडीनिमित्त उद्या गुरुवारी (ता. 07 सप्टेंबर) मुंबई प्रदेश महानगर क्षेत्रापैकी मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांसह शाळा आणि महाविद्यालये देखील दहीहंडीनिमित्त बंद राहतील. याशिवाय अनंत चतुर्दशीला म्हणजे गणेश विसर्जनादिवशीही सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे 28 सप्टेंबरला सुद्धा सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. (Government offices in Mumbai city and suburbs declared public holiday on the occasion of Gopalkala)

हेही वाचा – Dahihandi festival : मुंबई महापालिका रुग्णालांची तयारी; 125 खाटा अन् वैद्यकीय उपचारांची व्यवस्था

- Advertisement -

सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दहिकाला उत्सव पुरोगामी काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण आहे. या उत्सवात बाळगोपाळांपासून थोरामोठ्यापर्यंत तसेच महिलांही मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात.तेव्हा, हा उत्सव ’राष्ट्रीय सण“ म्हणून जाहिर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रामुख्याने मुंबई, ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या-छोट्या शहरामध्येही या उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने मोठ्या उत्साहात सण साजरा होत असतो. महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यासाठी स्पेन सारख्या देशामधून स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धक येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे दहिहंडी उत्सव साजरा होऊ शकला नाही. परंतू, या वर्षात उत्सव साजरा करण्यासाठी तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर तरूण- तरूणींचा सहभाग असलेला हा उत्सव ‘राष्ट्रीय सण’ म्हणून जाहिर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्यावी, अशी मागणी सुद्धा प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -