घरमुंबईकलेक्टरपद न मिळाल्याने गोविंद बोडके नाराज

कलेक्टरपद न मिळाल्याने गोविंद बोडके नाराज

Subscribe

कल्याण महावितरणमधील दुय्यम पदावर बोळवण

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदाचा कारभार गेली दोन वर्षे पद्धतशीरपणे हाताळणार्‍या माजी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची राज्यातील सत्तारुढ आघाडी सरकारने सपशेल विकेट काढली आहे. बोडके यांनी रायगड अथवा औरंगाबाद जिल्ह्याच्या कलेक्टरपदासाठी साखरपेरणी केल्याची खमंग चर्चा पालिका वतुर्ळात होती. मात्र, बोडके यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवताना आघाडी सरकारने कल्याणच्या विजेचा कारभार सांभाळणार्‍या महावितरण कंपनीची जबाबदारी बोडके यांच्याकडे देऊन त्यांची बोळवण केली आहे. या नव्या नियुक्तीमुळे बोडके नाराज असल्याची चर्चा आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदाचा कारभार साधारणपणे दोन वर्षांपूर्वी बोडके यांच्या हातात आला होता. हा कारभार मिळण्यासाठीही भाजपाच्या एका नेत्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बराच आग्रह धरला होता. अशी चर्चा त्यावेळी पालिका वर्तुळात होती. त्यामुळे बोडके यांचा कारभार हा भाजपाधार्जिणाच अधिक राहिला. शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे न करणे, कामे अडकवून ठेवणे, स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये लक्ष न देणे अशा तक्रारी त्यावेळी नगरविकास खात्याकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरदहस्त असल्याने बोडके यांच्याविरोधात कारवाई करण्याचे धाडस त्यावेळी कोणी दाखवू शकले नाही. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर या ही बोडके यांच्या कामकाजाबाबत समाधानी नव्हत्या. त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या एका शेर्‍याची पोस्टही सोशल मीडियावर फिरत होती. मात्र, त्याबाबतही बोडके यांनी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही. बोडके यांच्या काळात महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप होता.

- Advertisement -

मात्र, राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपाविरोधी सरकार सत्तेवर आल्यानंतर बोडके यांचे ग्रह काहीसे फिरले. बोडके यांनी नवीन सरकारशी जुळवून घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, नगरविकास सचिव हेच त्यांच्यावर नाराज असल्याने मोठी अडचण झाली. त्यामुळेच बोडके यांची इच्छा जरी कलेक्टर होण्याची असली तरी बोळवण मात्र कल्याणच्याच महावितरणसह व्यवस्थापकीय संचालक सारख्या दुय्यम पदावर करण्यात आल्याची चर्चा पालिका गोटात आहे. त्यामुळे निवृत्तीच्या काठावर असलेले बोडके हे नव्या नियुक्तीमुळे नाराज असले तरी नवी नियुक्ती स्वीकारतात की बदली रद्द करून घेतात याकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -