घरCORONA UPDATEशिकावू डॉक्टर बनला देवदूत; हॉस्पिटल्सने प्रवेश नाकारलेल्या गरोदर महिलेची घरातच प्रसूती

शिकावू डॉक्टर बनला देवदूत; हॉस्पिटल्सने प्रवेश नाकारलेल्या गरोदर महिलेची घरातच प्रसूती

Subscribe

चांदिवली येथे एका महिलेची घरातच प्रसूती झाल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णांचा, गरोदर महिलांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यातच चांदिवलीच्या पूजा भिसे यांनाही तब्बल तीन हॉस्पिटल्समध्ये प्रवेश नाकारल्यानंतर अखेर राहत्या घरी त्यांची प्रसूती करण्यात आली. विशेष, म्हणजे एका शिकावू डॉक्टराने त्यांची प्रसूती करून आई व बाळाला जीवनदान दिले.

नेमके काय घडले

चांदिवलीच्या साकिनाका येथे राहणारे पूज आणि दत्तात्रय हे दाम्पत्य. दत्तात्रय हे एका शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याचे काम करतात. पूजा भिसे यांना शुक्रवारी प्रसुती कळा येऊ लागल्या. त्यांचे पती दत्तात्रय यांनी तातडीने घाटकोपर पश्चिमेतील खासगी हॉस्पिटलमध्ये पत्नीला नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यापूर्वी त्यांनी पूजा यांची परळ येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड – १९ ची चाचणी करून घेण्यास सांगितले. पूजा यांना ताप असल्याकारणाने त्यांनी ही चाचणी करण्यास सांगितली. प्रसूती कळा सुरू असताना अशा अवस्थेत पत्नीला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे दत्तात्रय यांना शक्य नव्हते. त्यांनी पूजाला घाटकोपरमधीलच राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तिथे त्यांनी बेड्स उपलब्ध नसल्याचे कारण देत पूजा दाखल करून घेण्यास तसेच तिची चाचणी करण्यास नकार दिला. हताश झालेल्या दत्तात्रय यांनी जवळच असलेल्या जागृती नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पूजाला घेऊन गेले. मात्र तिथे त्यांना दाखल करून घेण्यासाठी हॉस्पिटलने १ लाख रुपये मागितले. दत्तात्रय यांनी आपण एक लाख रुपये शुल्क देऊ शकणार नसल्याचे त्यांना सांगितले. तसेच सध्या ६० हजार रुपये देण्याची तयारीही दाखवली. मात्र त्यांनी याकरता नकार दिला. हॉस्पिटलकडे थोडा वेळदेखील त्यांनी पैसे जमा करण्याकरता मागितला. मात्र हॉस्पिटलने त्याकरताही नकार दिला. अखेर दत्तात्रय पूजा यांना घेऊन घरी आले.

- Advertisement -

दरम्यान, शिकावू डॉक्टर असलेल्या डॉ. रविंद्र म्हस्के यांना दत्तात्रय भिसे यांनी संपर्क केला. त्यांनी यापूर्वीही पूजा यांची तपासणी केली होती. डॉ. म्हस्के यांनी तातडीने संघर्ष नगर येथील एसआरए कॉलनी काढली. डॉ. म्हस्के यांच्या मदतीमुळे पूजाने एका चिमुकलीला जन्म दिला. त्यामुळे डॉक्टरांच्या रुपाने देवच धावून आल्याची भावना पूजा आणि दत्तात्रय भिसे यांची आहे.

हेही वाचा – महापालिका कर्मचारी करोनाने दगावल्यास वारसांना ५० लाख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -