घरमुंबईआपट्याची पाने आदिवासींसाठी सोने

आपट्याची पाने आदिवासींसाठी सोने

Subscribe

शहापुरातील गरीब आदिवासींना मिळतेय पोटासाठी

दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. विविध प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जाते. तसेच शस्त्रांची पूजा केली जाते. या सणाला आपट्यांच्या पानांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सोने म्हणून आपट्याची पाने लुटली जातात. आदिवासी ही आपट्याची पाने दाट जंगलातून मुंबई, ठाण्यात विक्रीसाठी आणतात. वर्षातून एकदा का होईना, आपट्याची पाने आदिवासींची पोटाची खळगी भरत असल्याने शहापूरच्या गरीब आदिवासींसाठी ही पाने वरदान ठरली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, कसारा, खर्डी, डोळखांब, किन्हवली, टाकिपठार, दहागाव, माहुली, पिवळी कातबाव, अघई, टहारपूर या डोंगर दर्‍या-खोर्‍यांंत वास्तव्य करणारे आदिवासी दरवर्षी विजयादशमीला आपट्याची म्हणजेच शिदाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात. दाट जंगलातून मेहनतीने खुडून आणलेली ही पाने गोळा करून डोक्यावर त्यांच्या जुड्या वाहिल्या जातात. दसर्‍याच्या एक-दोन दिवस अगोदर ही पाने बाजारात विकायला आणतात.आदिवासी पुरुष, महिला ही पाने आसनगाव, वासिंद, खर्डी, आटगाव, कसारा येथून पुढे कल्याण, डोंबिवली, ठाणे,दादर येथील फूल मंडईत विक्रीसाठी नेतात. प्रचंड मागणी असलेल्या आपट्यांच्या पानांच्या जुडया बांधून त्याची ५ ते १० रुपयांपर्यंत ग्राहकांना विक्री केली जाते. आपट्यांच्या पानांसोबत तोरण बनविण्यासाठी झेंडूची फुले, भातांची कोंब, आंब्याची पाने आदिवासी विक्रीसाठी आणतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -