जिल्ह्यात हरितक्रांती घडवू : पालकमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा जिल्हास्तरीय आरंभ मौजे शीळ (गोठेघर) शीळफाटा येथे पाकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्ष रोप लावून करण्यात आला.

green revolution in thane
ठाण्यात हरितक्रांतीचा पालकमंत्र्यांचा निर्धार

प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा. मागील वर्षी लावलेली ८० टक्के झाडं आपण जगवली आहेत. या वर्षी आपण सर्व झाडे जगवू व हरित ठाणे साकारण्याचा संकल्प करु या, असे आवाहन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मौजे शीळ (गोठेघर) शीळफाटा ठाणे येथे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात बोलताना केले. राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा जिल्हास्तरीय आरंभ मौजे शीळ (गोठेघर) शीळफाटा येथे पाकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्ष रोप लावून करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,आमदार सुभाष भोईर, मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे पोलीस उप अधिक्षक कुंभारे उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हा

यावेळी आमदार सुभाष भोईर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनीही वृक्षरोपण केले. या कार्यक्रमात सिबॉसिल कॉन्व्हेन्ट स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने ‘एक झाड दत्तक घेऊ. त्या झाडाची योग्य निगा राखू. व पुढील वर्षी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करू’ असा संकल्प केला. यावेळी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.