घरCORONA UPDATEमुंबईतील खासगी लसीकरण शिबिरांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या नव्या गाइडलाईन्स

मुंबईतील खासगी लसीकरण शिबिरांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या नव्या गाइडलाईन्स

Subscribe

मुंबईत लसीकरणासंदर्भात झालेले घोटाळे समोर आल्यानंतर पालिकेने कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी पालिकेने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मुंबईत खासगी सोसायट्यांच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी पालिकेने नव्या गाईडलाइन्स जरी केल्या आहेत. मुंबईत लसीकरणासंदर्भात झालेले घोटाळे समोर आल्यानंतर पालिकेने कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी पालिकेने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (guidlines on covid19 vaccination at work place Private housing societies)  मुंबईतील खासगी सोसायट्यांच्या लसीकरण केंद्रांसाठी  पालिकेने जारी केलेल्या नव्या गाइडलाईन्स जाणून घ्या.

पालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोसायटीने एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. नोडल अधिकाऱ्यांला दिलेल्या जबाबदाऱ्यांची तपशीलवार माहिती देण्यात यावी लागणार आहे. नोडल अधिकारी लसीकरण मोहिम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सामंजस्य करार करुन लसीकरण शिबीराचे बारकाईने निरिक्षण करतील.

- Advertisement -

खासगी लसीकरण शिबिरांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या गाइडलाईन्स

  • खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर आलेल्या स्थानिक नागरिकांनी कोविन एँपवर नोंदणी केली आहे का तपासावे.
  • खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर डोसचे शुल्क त्यांची संख्या या सर्व नोंदी नोडल अधिकाऱ्यांनी ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • नोडल अधिकाऱ्याने कोरोना लस घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तींची यादी, ज्यात खासगी कोरोना लसीकरणाचा तपशील, तरिख आणि संपूर्ण माहिती पुरवणे महत्त्वाचे आहे.
  • खासगी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याआधी किमान तीन दिवस आधी स्थानिक आरोग्य अधिकारी आणि पोलिसांना याविषयी माहिती आवश्यक आहे.
  • खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांला लसीकरण केंद्रावर बारिक लक्ष ठेवून त्या ठिकाणी लसीकरणासंदर्भात कोणताही चुकीचा किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याविषयी स्थानिक अधिकारी किंवा पोलिसांना याविषयीची माहिती देणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर असलेल्या नोडल अधिकाऱ्यांने कोरोना लसीसाठी आलेल्या अर्जाचा योग्य तपशील द्यावा. त्याचप्रमाणे ज्याचे लसीकरण झाले त्यांना लसीकरणाचे डिजिटल प्रमाणपत्राची लिंक देणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांची आता RT-PCR चाचणी होणार नाही, पालिकेची नवी SOP

 

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -