घरमुंबईमोदी नटसम्राट, त्यांना ऑस्कर द्या; जिग्नेश मेवाणीची टीका

मोदी नटसम्राट, त्यांना ऑस्कर द्या; जिग्नेश मेवाणीची टीका

Subscribe

ज्या प्रकल्पाचा शेतकर्‍यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी काडीचा उपयोग होणार नसेल, तो प्रकल्प हवाच कशाला, अशी विचारणा करत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी बुलेट ट्रेनसाठी एक इंचही जागा देणार नाही, असा इशारा दिला आहे. वसईत शेतकर्‍यांच्या पर्यावरण संवर्धन मेळाव्यात जिग्नेश मेवाणी बोलत होते. बुलेट ट्रेनसाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर आणणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जिग्नेश यांनी टीका केली.

हजारो ग्रामस्थांनी वसईत नव्याने विकसित होणार्‍या बुलेट ट्रेन व मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विकास आराखड्याच्या प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी उदध्वस्त होणार आहेत. पर्यावरण संवर्धन समितीतर्फे पर्यावरण संवर्धनाची माहिती देण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, भूमीसेना संस्थापक काळूराम धोदडे, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू, समीर वर्तक इत्यादी मान्यवर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

- Advertisement -

हे वाचा – मोदीजी बुलेट ट्रेन नको; भाजप नेत्याचा घरचा आहेर 

जिग्नेश मेवाणी यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जो काही विकास होत आहे किंवा होणार आहे तो उद्योगपतींना गृहीत धरून केला जात असल्याचेही जिग्नेश म्हणाले. मोदी हे ‘झूठ के शहंशहा’ आहेत. सर्व ऑस्कर त्यांनाच द्यावेत. ते खरे नटसम्राट आहेत, असे मेवाणींनी म्हटले. देशातील ८० टक्के लोक आजही २० रुपयांपेक्षा कमी कमवतात. देशात ४० कोटी पेक्षा अधिक लोक बेघर आणि झोपड्यांमध्ये राहतात. मग बुलेट ट्रेनमध्ये बसणार कोण, असा सवाल त्यांनी केला. देशातील हिंदूंवर मोदींनी खर्‍या अर्थाने अन्याय केला आहे. मोदी हे देशाचे नटसम्राट असून त्यांना ऑस्कर दिला पाहिजे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

देशातील हिंदू धोक्यात असल्याची आवई उठविली जात आहे, पण खरे बघितले तर सध्याच्या घडीला देशातील संविधान धोक्यात आले आहे, हे पाप हे विद्यमान सरकार करत आहे. माझे महाराष्ट्राशी नाते शिवराय आणि भीमरायांचे आहे, मला कितीही विरोध करा मी महाराष्ट्रात येत राहणारच, असे त्यांनी ठणकावले. सरदार पटेल यांच्या पुतळ्यावरून त्यांनी टीका केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ कोटी खर्च करून पुतळा उभारण्याची घोषणा मोदी यांनी केली आहे. मात्र आम्हाला पुतळा नको, त्याऐवजी ग्रंथालय आणि रुग्णालय उभारा असेही त्यांनी सांगितले.


आमदार जिग्नेश मेवाणीला वसईत येण्यास मज्जाव करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -