घरमनोरंजनKiran mane : 'मुलगी झाली हो' मलिकेचं साताऱ्यातील शूटिंग बंद; गुळुंबु ग्रामपंचायतीचा...

Kiran mane : ‘मुलगी झाली हो’ मलिकेचं साताऱ्यातील शूटिंग बंद; गुळुंबु ग्रामपंचायतीचा निर्णय

Subscribe

गुळुंब ग्रामपंचायतीच्या संरपच स्वाती शिवाजी माने यांच्या नावाने हे पत्र मालिकेच्या पॅनोरामा एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊसला पाठवण्यात आले आहे. 

अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयाचा चहूबाजूंनी विरोध होत आहे. फक्त मनोरंजनसृष्टीतच नाही तर राजकीय वर्तुळातूनही किरण यांना पाठिंबा मिळत आहे. सोशल माीडियावरही अनेकांनी या घटनेचा प्रचंड निषेध व्यक्त केला जातोय. या मालिकेत किरण माने एक महत्वाची भूमिका साकारत होते. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्याने सर्वच स्तरातून संपात व्यक्त होतोय. या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील गुळुंब ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेले ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे शूटिंग गुळुंब ग्रामपंचायतीने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुळुंब ग्रामपंयतीने मालिकेच्या पॅनोरामा एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसला मालिकचे शूटिंग थांबवण्या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढून टाकल्याबद्ल चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी हे पत्र आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. “अभिनंदन वाघिणीचे ! करेक्ट कार्यक्रम ..” अशी कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट केली आहे.

गुळुंब ग्रामपंचायतीने पत्रात लिहिले की, राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनी व मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरु नये अजून ही महाराष्ट्रात शिव शंभू शाहू फुले, आंबेजकरांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते.

- Advertisement -

अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी व मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचायत गुळुंब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही. असं आशयाचे पत्र लिहिले आहे. गुळुंब ग्रामपंचायतीच्या संरपच स्वाती शिवाजी माने यांच्या नावाने हे पत्र मालिकेच्या पॅनोरामा एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊसला पाठवण्यात आले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -