गुणरत्न सदावर्तेंनी केली राजकीय संघटनेची स्थापना, लढवणार ‘ही’ निवडणूक

Gunaratna Sadavarte founded a political organization
Gunaratna Sadavarte founded a political organization

नुकतेच गुणरत्न सदावर्तेंनी एसटी बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याची घोषणा केली आहे. यानंतर त्यांनी राजकीय संघटनेची स्थापना केली आहे. त्यांनी एसटी कष्टकरी जनसघ ही संघटना स्थापन केल्याची अधिकृत घोषणा आज केली.

वकील गुणरत्न सदावर्तें एसटी महामंडळाच्या बँकेची निवडणुक लढवणार आहेत. यासाठी त्यांनी पॅनल उभे करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता त्यांनी नव्या राजकीय संघटनेची स्थापना केली असून त्याची अधिकृत घोषणा त्यांनी आज केली. त्यांच्या संघटनेचे नाव एसटी कष्टकरी जनसघ असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना निवडणूक लढवणार आहे.

गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांच्या संपात सहभागी झाल्यानंतर कायम आपल्या निशाण्यावर शरद पवार यांनाच ठेवले होते. शरद पवार यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान केले, जाणीवपूर्वक तेच विलिनीकरण टाळत असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला होता.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत –

राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. नव्या संघटनेची स्थापना करून सदावर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.