गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली – गुणरत्न सदावर्ते

Mumbai Police sends notice to Gunaratna Sadavarten
Mumbai Police sends notice to Gunaratna Sadavarten

वकील गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केली. यावेळी सदावर्तेंनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. महात्मा गांधींची हत्या केलेल्या गोडसेंच्या नावाचा गोडसेजी असा उल्लेख त्यांनी केला. गांधीजींनी श्वास सोडताना हे राम म्हटल्याचे इतिहासात लिहिले आहे. मात्र, नथूराम गोडसेजी यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी गोडसेजींनी स्पष्ट केले होत की महात्मा गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हटल नव्हते, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

नथूराम गोडसे याचा उल्लेख गोडसेजी असा केला. गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असून देशात एक मोठे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांकडून करण्यात येत आहे, असा आरोप यावेळी सदावर्ते यांनी केला. महात्मा गांधी यांनी श्वास सोडताना श्रीराम म्हटले होते असे सांगितले जाते. मात्र, नथुराम गोडसेजींची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळीं गोडसेजी यांनी स्पष्ट केले होते की महात्मा गांधींनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हंटले नव्हते. असे वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केले.

70 वर्षात कष्टकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यांना न्याय मिळला नाही. कर्मचाऱ्यांचा फक्त कार्यकर्ते म्हणून वापर करण्यात आला. मात्र, यापुढे आम्ही कष्टकऱ्यांसाठी लढू. त्याना न्याय निळवून देवू. मातृभूमिसोबत प्रामाणिकपणा आणि मानवातावाद यातून कष्टकऱ्यांचा विकास ही आमची भूमिका आहे. राम जन्मभूमिचे आम्ही वकील होतो. न्यायालयात आम्ही याबाबत लढलो आहे. प्रभू रामचंद्रांचा आर्शीवाद घेऊन आम्ही लढणार आहोत, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.