घरCORONA UPDATECoronavirus: हाफकीनमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट चाचण्या; शास्त्रज्ञ २४ ऑनड्युटी

Coronavirus: हाफकीनमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट चाचण्या; शास्त्रज्ञ २४ ऑनड्युटी

Subscribe

कोरोनाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेले डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी, आरोग्य सेवक आणि पोलीस यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना कोणतीही अपेक्षा न ठेवता मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेतील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ दिवसरात्र कोरोनाच्या चाचण्या करत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन हे शास्त्रज्ञ आपला जीव धोक्यात घालून प्रयोगशाळेच्या क्षमतेपेक्षा अधिक चाचण्या दररोज करत आहेत. दिवसाला १०० चाचण्यांची क्षमता असलेल्या प्रयोगशाळेत तब्बल १७० ते १८० चाचण्या केल्या जात आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने राज्यात करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे नियोजन करताना हाफकिनकडे पालघर जिल्ह्यातील हॉस्पिटल, उल्हासनगर महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, वसई-विरार महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलकडून येणाऱ्या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्याची जबाबदारी सोपवली. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात घराघरांमधून जमा करण्यात येणाऱ्या नमुन्यांची चाचणी करण्याची जबाबदारीही हाफकिनवर सोपवण्यात आली. एक जिल्हा, पाच महानगर पालिका, दोन नगरपालिका इतक्या मोठ्या परिक्षेत्रातील नमुने रोज मोठ्या संख्येने हाफकिनच्या प्रयोगशाळेत येत आहेत. हाफकिनमध्ये दोन प्रयोगशाळा आहेत. या दोन्ही प्रयोगशाळेमध्ये दिवसाला प्रत्येकी १०० चाचण्या करता येत होत्या. मात्र राज्यामध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत हाफकिनच्या दोन्ही प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञ २४ तास काम करत आहेत.

- Advertisement -

प्रयोगशाळेची क्षमता १०० चाचण्यांची असताना प्रत्येक प्रयोगशाळेत तब्बल १७० ते १८० चाचण्या रोज केल्या जात आहेत. या चाचण्या करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम करत आहेत. अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ हे घरी न जात प्रयोगसशाळेतच दिवसरात्र काम करत आहेत, अशी माहिती हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

प्रयोगशाळेमध्ये वेळेत सुधारणा

हाफकिनमध्ये असलेल्या दोन प्रयोगशाळेपैकी एक प्रयोगशाळा ही हाफकिनची आहे तर दुसरी प्रयोगशाळा ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) सहकार्याने सुरु केलेली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडताच सरकारने या दोन्ही प्रयोगशाळांमध्ये तातडीने सुधारणा केल्या. यामुळे प्रत्यक्षात कोरोनाच्या युद्धात हाफकीनला मोठी जबाबदारी पार करणे शक्य झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -