मुंबईतील रस्ते अपघातात सर्वाधिक दुचाकीस्वारांचे मृत्यू

मुंबईत 47 टक्क्यांहून अधिक रस्ते अपघात हे दुचाकी वाहनांमुळे होत असल्याची माहिती समोर येत आहे.

kargil to srinagar zojila pass road accident tavera vehicle fell 500 feet in zojila ditch 8 people feared dead
कारगिलहून श्रीनगर मार्गावरील 500 फूट खोल दरीत कोसळली कार; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

दुचाकी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सुचना वारंवार वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) दिल्या जातात. मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष करत अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे अनेकांना दडात्मर कारवाईचा सामना करावा लागतो, तर काहींना रस्ते अपघातात (Road Accident) आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे आता मुंबईत (Mumbai) दुचाकीचालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत 47 टक्क्यांहून अधिक रस्ते अपघात हे दुचाकी वाहनांमुळे होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये शहरात झालेल्या 1,812 रस्ते अपघातांमध्ये 350 लोकांचा मृत्यू झाला. शिवाय, यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी अधिक तापसणी आणि आकडेवारीची पडताळणी केली. त्यानंतर असे समोर आले की, मुंबईत रस्ते अपघातात 47.42 टक्के मृत्यू हे दुचाकी वाहनांमुळे झाल्याचे निदर्शनास आले.

त्याशिवाय, या अपघातांमध्ये 148 म्हणजेच 42.28 टक्के पादचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. चारचाकी वाहनांमुळे 22 जणांचा मृत्यू झाला. तसेच, तीन चाकी वाहनांमुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून, ६ सायकलस्वारांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

15 दिवसांत निर्णयाची अंमलबजावणी

मुंबईत आता दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून (Traffic Department) पुढील 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. दुचाकीलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

2000 रुपयांचे चलान

मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी चालवताना हेल्मेट घातले आहे, पण हेल्मेटची स्ट्रिप लावली नसेल, तर 1000 रुपयांचे चलान कापल जाऊ शकते. तसेच, आपण सदोष हेल्मेट म्हणजेच BIS नसलेले हेल्मेट घातले असल्यास 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. नियम 194D MVA नुसार ही दंडात्मक कारावई केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 2000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. त्यामुळे आता दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारच असेल, शिवाय हेल्मेटची स्ट्रिप लावणेही आवश्यक असणार आहे.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, आपले वाहन ओव्हरलोडेड असेल तर, आपल्याला 20,000 रुपये एवढा जबरदस्त दंडही होऊ शकतो. याशिवाय असे केल्यास आपल्याला प्रति टन 2000 रुपयांचा अतिरिक्त दंडही द्यावा लागू शकतो.


हेही वाचा – Anil Parab ED Raid : साडेतेरा तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक परबांच्या घराबाहेर, सात ठिकाणी ईडीच्या धाडी