घरमुंबईमाहिममधील अनधिकृत मजारीवर हातोडा

माहिममधील अनधिकृत मजारीवर हातोडा

Subscribe

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, पोलीस संरक्षणात बेकायदा बांधकाम तोडले

पुढील महिनाभरात माहिमच्या खाडीत बांधलेली अनधिकृत मजार न हटवल्यास तिच्या बाजूलाच गणपती मंदिर बांधू, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीर भाषणात दिला होता. त्यांच्या अल्टिमेटमला १२ तासही पूर्ण होत नाहीत तोच मुंबई महापालिका प्रशासनाने अ‍ॅक्शन मोडवर येत या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. मुंबई महापालिकेने पोलिसांच्या संरक्षणात ही कारवाई केली.

गुढीपाडव्यानिमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात राज ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी विविध राजकीय मुद्दे छेडल्यानंतर एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओद्वारे माहिमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा पुरावा त्यांनी दिला. हे अनधिकृत बांधकाम गेल्या 2 वर्षांत झाल्याचेही त्यांनी सांगितले. माहिमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या मागील समुद्रात मुस्लीमधर्मीयांनी जे काही अनधिकृत बांधकाम केले आहे ते तोडा, अशी विनंती राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई महापालिका आयुक्तांना केली. तसेच महिनाभरात हे अनधिकृत बांधकाम न हटवल्यास या मजारीशेजारीच मोठे गणपती मंदिर उभारू, काय व्हायचे ते होऊ दे असा इशाराही दिला.

- Advertisement -

अशी झाली कारवाई
राज ठाकरेंच्या इशार्‍यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रात्रीच अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याबाबतचे आदेश काढले. त्यानुसार गुरुवारी सकाळी 8 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाचे पथक माहिम परिसरात पोहोचले. त्यानंतर पोलीस संरक्षणात जेसीबीच्या साहाय्याने चौथरा आणि इतर अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे 6अधिकार्‍यांचे पथक या कामगिरीसाठी तैनात करण्यात आले होते.

हे तर मॅच फिक्सिंग – आव्हाड
मुंबई महापालिकेने राज ठाकरेंच्या इशार्‍यानंतर केलेली कारवाई म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. जिल्हाधिकार्‍यांचा आदेश ट्विट करून बाकी सगळे टाईप करून ठेवले होते. तारीख फक्त टाकायची होती. २००७ मध्ये ही बातमी पहिल्या पानावर छापून आली होती, असा संदर्भही आव्हाड यांनी दिला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -