घरमुंबईHanuman Chalisa Row : खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली; जे.जे रुग्णालयात...

Hanuman Chalisa Row : खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली; जे.जे रुग्णालयात केले दाखल

Subscribe

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

हनुमान चालिसा वादावरून तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना उपचारांसाठी आता जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नवनीत राणा या भायखळा कारागृहात होत्या. यापूर्वी 2 मे रोजी त्यांची प्रकृती खालावली होती. तेव्हा राणा यांच्या वकिलांनी तुरुंगात वैद्यकीय मदत देत नसल्याचा आरोप केला होता. राणा यांच्या वकिलांनी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून लवकरात लवकर वैद्यकीय मदत देण्याची विनंती केली होती. त्यानंतर पुन्हा राणा यांच्या वकीलांनी योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप केला होता. सीटी स्कॅन केल्याशिवाय उपचार करू नका, असे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे.

दरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. याआधी सोमवारीही सुनावणी झाली, मात्र यावेळी कोर्टात त्यांच्या जामीन अर्ज निर्णय झाला नाही. सुरुवातीला कोर्टात इतर प्रकरणांची सुनावणी आणि नंतर वेळेच्या कमतरतेमुळे सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 15A, 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्याविरोधात 124A म्हणजेच देशद्रोहाचे कलमही लावण्यात आले आहे.

- Advertisement -

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या वादातून दोघांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत असून उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.


Raj Thackeray Video : भोंगे उतरवण्याचा बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाणा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -