घरमुंबई'हर घर दस्तक' मोहिमेद्वारे गतिमान लसीकरण, १२ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण

‘हर घर दस्तक’ मोहिमेद्वारे गतिमान लसीकरण, १२ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण

Subscribe

या मोहिमेत महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिली व दुसरी मात्रा न घेतलेली मुले तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत.

मुंबईत कोरोना रुग्ण (corona patients in Mumb) संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेत राज्य शासन व मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा(Mumbai Municipal Health System) कामाला लागली आहे. महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्सच्या (Maharashtra Corona Task Force) सुचनेनुसार मुंबई महापालिकेने (mumbai Municipal Corporation) १ जूनपासून ‘हर घर दस्तक’ (Har Ghar Dastak campaign) मोहिम हाती घेत लसीकरण जलदगतीने सुरू केले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मुंबईत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. पालकांनी लसीकरणासाठी पात्र आपल्या मुलांना घराजवळच्या कोरोना लसीकरण केंद्रावर नेऊन त्यांना लसीचा डोस द्यावा. तसेच, लसीकरणासाठी पात्र मुलेसुद्धा स्वतः लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीचे डोस तज्ज्ञांकडून घेऊ शकतात.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिका हद्दीत १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत १८ वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

तसेच, ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे आणि १६ मार्च २०२२ पासून १२ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे कोरोना-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्‍यात येत आहे. यासाठी महापालिका व शासकीय रुग्णालयात १०७, खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २३२ कोरोना-१९ लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १२ टक्के लसीकरण झाले आहे. तर १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे ५७ टक्के व दुसर्‍या मात्रेचे ४५ टक्के लसीकरण झालेले आहे. थोडक्यात, १८ वर्षावरील पात्र नागरिकांच्या तुलनेत १२ ते १७ या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १ जून ते ३१ जुलै २०२२ पर्यंत “हर घर दस्तक मोहीम ” राबविण्यात येत आहे. यामध्ये १२ ते १४ वर्ष व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्ष व अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेत महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिली व दुसरी मात्रा न घेतलेली मुले तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -