घरट्रेंडिंगआयपीएलच्या तोंडावर हरभजनची 'लकी' बॅट गायब

आयपीएलच्या तोंडावर हरभजनची ‘लकी’ बॅट गायब

Subscribe

माझी बॅग कुठे हरवली हे कोणी सांगेल का ? अशा शब्दात हरभजन सिंहने एका विमान कंपनीचा समाचार घेतला आहे. मुंबईतून बंगळुरू प्रवासादरम्यान कीटमधून बॅट हरवल्यामुळे हरभजन सिंहची आगपाखड झाली. माझी बॅट हरवली आहे की चोरली आहे असेही त्याने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. आगामी आयपीएल सिझनच्या तोंडावरच आपली लकी बॅक हरवल्याने हरभजन इंडिगोच्या कारभारावर भडकला आहे. माझी बॅट पुन्हा मिळेल अशी आशा करतो अशा शब्दात त्याने इंडिगो एअरलाईन्सला सुनावले आहे.

- Advertisement -

मी बंगळुरूत दाखल झालोय, पण मला माझी बॅट मिळत नाहीए. मी अस म्हणत नाही की ती चोरीला गेली आहे, पण मला ती मिळत नाहीए अस हरभजन म्हणाला आहे. आमच्या संघाने अतिरिक्त बॅगेजसाठीची सुविधा मागितली होती. पण ही सुविधा मागूनही आमच्याकडे अतिरिक्त पैसे मागण्यात आले. मी माझी किट बॅग सरावासाठी उघडलीच नव्हती. आम्ही ३५ किलो बॅगेजचा पर्याय निवडला होता. पण एअरपोर्ट ऑथोरिटीने आमचे बॅगेज जास्त असल्याचे सांगत अतिरिक्त असे १२०० रूपये द्या म्हणून सांगितले. आम्ही हे पैसे देण्यासाठी नकार दिला होता. माझी बॅग हरवण्याचा प्रकार आहे की बॅगेज न दिल्यामुळे आहे असा सवाल त्याने केला आहे. मी या बॅटसोबत आयपीएलमध्ये खेळलो आहे. त्या बॅटने मी नुकतीच जुहू येथे प्रॅक्टीस केली होती. माझ्यासाठी ही बॅट खूप महत्वाची आहे अशी तक्रारी मी एअरपोर्ट ऑथोरिटीकडे केली आहे. इंडिगोने यावर बॅट शोधून देण्यात येईल असे उत्तर दिले आहे. मला वाटत की ती बॅट मिळावी. तसेच झालेल्या प्रकाराबाबत इंडिगोने हरभजन सिंहची माफीदेखील मागितली आहे.

- Advertisement -

हरभजन सिंह हा यंदा चेन्नई सुपर किंग्जसोबत आयपीएलसाठी खेळणार आहे. चैन्नईच्या संघात आपले स्थान कायम ठेवण्यात त्याला यश आले आहे. महत्वाच म्हणजे फ्रॅंचायसीनेही त्याला कायम केले आहे. धोनीने याआधीच चेन्नई गाठत आयपीएलसाठी सराव करायला सुरूवात केली आहे. धोनीने २०१९ च्या वर्ल्डकप नंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या सरावासाठी कमबॅक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -