सीएसएमटी ते गोरेगाव लोकल प्रवास होणार जलद

हार्बर मार्गावरून (Harbor Line) पश्चिम मार्गवार (Western Line) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव लोकलचा प्रवास वेगवान होणार आहे. सीएसएमटी-गोरेगाव (CSMT to Goregaon) मार्गावरील वेगमर्यादा हटविण्यात आली आहे.

22-year-old youth dies after falling from mumbai local train

हार्बर मार्गावरून (Harbor Line) पश्चिम मार्गवार (Western Line) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव लोकलचा प्रवास वेगवान होणार आहे. सीएसएमटी-गोरेगाव (CSMT to Goregaon) मार्गावरील वेगमर्यादा हटविण्यात आली आहे. तसेच, गोरेगाव ते माहीम दरम्यान असलेल्या वळणाची तीव्रता कमी करण्यास पश्चिम रेल्वेला यश आले आहे. त्यामुळे आता या मार्गावरील लोकल वेगाने धावणार आहेत. (Harbor line csmt and western line goregaon local train will become faster)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव स्थानकादरम्यान दररोज लोकलच्या ११२ फेऱ्या होत असतात. वेगमर्यादा वाढल्याने आता या गाड्यांना हा फायदा होणार आहे. सीएसएमटी-गोरेगाव मार्गावरील लोकलचा वेग वाढण्यासाठी आणि वेगाने तीव्र वळणावर रुळांवरून लोकल घसरून अपघात होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष कामे हाती घेतली होती. परिणामी प्रवाशांचाही लोकल प्रवासातील वेळ वाचणार आहे.

दरम्यान, वेगमर्यादेमुळे लोकलच्या वक्तशीरपणावर परिणाम होत होता. त्यामुळे वळणाची तीव्रता कमी करण्यासाठी पंधरा दिवस माहीम स्थानकातील थांबा काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता.

सध्या या स्थानकादरम्यान तांत्रिक कामे शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण केली जाणार असल्याचे समजते. तसेच, या मार्गावरील वेगमर्यादा हटविण्यात येणार आहे. वेगमर्यादा हटवल्यानंतर लोकलचा वेग वाढणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

माहीम स्थानकात ३५ किमी प्रति तास अशी वेगमर्यादा होती. या कामामुळे ती लवकरच ५० किमी प्रति तास इतकी होणार आहे. दादर आणि भाईंदर स्थानकातील वेगमर्यादा १५ वरून ३० किमी प्रति तास अशी बदलण्यात आलेली आहे. वेग मर्यादेत बदल केल्यानंतर सरासरी ५ ते १० मिनिटे प्रवास वेळेत बचत शक्य होणार आहे.

अंधेरी ते गोरेगाव दरम्यानही काही ठिकाणी वेगमर्यादा हटविण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.


हेही वाचा – 164 आमदारांच्या पाठिंब्याचा भाजपचा दावा, देवेंद्र फडणवीस उद्या रात्री शपथ घेण्याची शक्यता