आठवड्याच्या मधल्या दिवशीच हार्बर रेल्वेने घेतला ब्लॉक; प्रवाशांचा मात्र खोळंबा

mumbai local train mega block
प्रातिनिधिक छायाचित्र

रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे हार्बर रेल्वेने नियोजित ब्लॉक रद्द केला होता. मात्र आज मंगळवारी कोणतीही पुर्वसूचना न देता मधेच ब्लॉक घेतला आहे. आठवड्याच्या मधल्या दिवशी नोकरदारांची कामावर जाण्याची घाई असल्यामुळे शक्यतो असा ब्लॉक घेतला जात नाही. मात्र हार्बर रेल्वेच्या या अनाकलनीय कारभारामुळे नवी मुंबईकर मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.

सकाळी वाशी किंवा पनवेल वरून निघालेल्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीरा धावत आहेत. दुपारी कडक उन्हात ट्रेन एका जागीच थांबून असल्यामुळे प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना देखील या ब्लॉकसंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.