घरमुंबईलग्नात हुंडा मिळाला नाही' म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

लग्नात हुंडा मिळाला नाही’ म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

Subscribe

हुंड्यासाठी अजून कित्येक महिलांना जीव गमवावा लागेल, असा प्रश्न समाजापुढे निर्माण झाला आहे.

मुंबईयेथील बोरीवलीयेथे लग्नात हुंडा मिळाला नाही, म्हणून पतीने त्याचा पत्नीचा खून केला आहे. ही रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने हा अपघात असल्याचे पोलिसांना भासवले होते. परंतु अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना या माहितीचा खरा छळा लागला.

फहीन (२१) असे या मृत महिलेचे नाव आहे. काहीमहिन्यांपूर्वीच फहीनचे आरोपी इमाम याच्याशी लग्न झाले होते. परंतु फहीन हिच्या कुंटुंबाकडून हुंडा मिळाला नसल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण होऊ लागला. याची कल्पना फहीनच्या नातेवाईकांना होती. रविवारी फहीनच्या कुटुंबातील सदस्य तिच्याशी बोलण्यासाठी फोन करु लागले. परंतु फहीन त्यांचा फोन उचलत नव्हती. त्यामुळे फहीनच्या कुटुंबाला चिंता वाटू लागली. इमामने काहीवेळेनंतर फहीनच्या घरी फोन करुन तिला बरे नाही, म्हणून तिला रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. फहीनचे नातेवाईक जेव्हा रुग्णालयात पोहचले, तेव्हा ती मृत अवस्थेत होती, असे फहीनच्या नातेवाईकांनी सांगितले. माहितीनुसार इमामचे अगोदरच एक लग्न झाले होते. यामुळे फहिनच्या नातेवाईकांनी या लग्नाला विरोध केला होता. परंतु तिच्या आग्रहासाठी तिच्या पालकांनी होकार दिला.

- Advertisement -

आरोपी इमाम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. कांदिवली पोलिसांनी इमामवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -