SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमावरच CBSC बोर्डाची अकरावीची सीईटी

high court

राज्य सरकारने अकरावी प्रवेशाच्या सीईटीबाबत (CET) परिपत्रक जारी करत सीईटी परीक्षेची घोषणा केली होती. पण या सीईटी परीक्षेसाठी एसएससी बोर्डाचा (SSC Board) अभ्यासक्रम असे परिपत्रकात नमुद करण्यात आले होते. या परिपत्रकातील अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावर आक्षेप घेत एका अनन्या पत्की या विद्यार्थीनीने आपल्या वडिलांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात परिपत्रकाला स्थगिती देण्याची याचिका दाखल केली. आज मुंबई उच्च न्यायालयात मुलीच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत एसएससी (SSC) बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित सीबीएससी (CBSC) बोर्डाच्या अकरावी सीईटीला उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे. यावेळी उच्च न्यायालयात आयसीएसई (ICSE) बोर्डाची गैरहजेरी होती. तसेच कुणाचाही वकालतनामा न्यायालयाकडे आलेला नाही.

आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान राज्य सरकारचीबाजू मांडणारे महाधिवक्ता आशुषोत कुंभकोणी यांनी अकरावी सीईटाला विरोध करणारी याचिका फेटाळून लावा अशी मागणी केली. अकरावी सीईटीसाठी १० लाख विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे न्यायालयापुढे आलेल्यांपेक्षा न्यायालयापुढे न आलेल्यांचा विचार करावा, असे राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडेल.

महाराष्ट्र एसएससी बोर्डाचे १६ लाख विद्यार्थी तर सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाचे ४ लाख विद्यार्थी आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या सीईटी परीक्षेबाबतच्या परिपत्रकात या तिन्ही बोर्डासाठी एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारीतच सीईटी परीक्षा घेण्यात येईल असे नमुद करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही प्रश्न केले होते. जर दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत ही परीक्षा असणार आहे, तर सीबीएससी आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल न्यायालयाने केला आहे. त्याबाबत आज राज्य सरकार म्हणाले की, विविध बोर्डांच्या अभ्याक्रम एकत्र करत प्रश्नपत्रिका तयार करणे अशक्य आहे. मात्र असं असेल तर फक्त एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर सीईटी कशी घेतला येईल, असा सवाल आज महाधिवक्त्यांना न्यायालयाने केला. त्यावेळेस ते महाधिवक्ता म्हणाले की, ‘राज्यातील एसएससीच्या विद्यार्थ्यांना ध्यानात ठेवून आमची सीईटी आखलेली आहे.’