घरअर्थजगतबनावट संदेश, कॉल्सबद्दल एचडीएफसी बँकेने ग्राहकांना केले अलर्ट, संदेश कसे ओळखायचे हे...

बनावट संदेश, कॉल्सबद्दल एचडीएफसी बँकेने ग्राहकांना केले अलर्ट, संदेश कसे ओळखायचे हे देखील सांगितले

Subscribe

आजकाल लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्यासंदर्भात अनेक प्रकारचे बनावट संदेश मिळत आहेत. हे संदेश कसे ओळखायचे हे देखील एचडीएफसी बँकेने सांगितले आहे. अनेक वेळा लोक अशा फेक मेसेजच्या जाळ्यात अडकतात. यामुळे आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना बनावट संदेश (fake message), ईमेल (email) किंवा कॉल्सबद्दल (calls) सतर्क केले आहे. बँकेने याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये (tweet) बँकेने म्हटले आहे की, अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका ज्यामध्ये पॅन कार्ड (PAN card)अपडेट करण्यास सांगितले जात आहे. तसेच ग्राहकांनी त्यांची गोपनीय माहिती कधीही एसएमएसवर शेअर करू नये.

एचडीएफसी बँकेने पॅन कार्ड अपडेटशी संबंधित अलर्ट जारी केला आहे. बँकेने #GoDigitalGoSecure या हॅशटॅगसह एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये अशा लिंकवर क्लिक न करण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. अशा लिंकमध्ये आजकाल लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्यासंदर्भात अनेक प्रकारचे बनावट संदेश मिळत आहेत. हे संदेश कसे ओळखायचे हे देखील एचडीएफसी बँकेने सांगितले आहे. अनेक वेळा लोक अशा फेक मेसेजच्या जाळ्यात अडकतात. यामुळे आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना बनावट संदेश, ईमेल किंवा कॉल्सा प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

बनावट संदेश कसे ओळखायचे
बँकेने फेक मेसेज ओळखण्यासाठी एक चित्र जारी करून सांगितले की, सर्वप्रथम मेसेज कोणत्या नंबरवरून आला आहे ते पहा. बँका फक्त अधिकृत क्रमांकांवरून संदेश पाठवतात. हे क्रमांक प्रत्येक बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. HDFC चा अधिकृत क्रमांक 186161 आहे. याशिवाय HDFCBK/HDFCBN कडून HDFC बँक संदेश पाठवते. याशिवाय बँक तुम्हाला लिंक पाठवत असली तरी त्याचे डोमेन hdfcbk.io असेल. तसेच, बँकेने म्हटले आहे की, ते कधीही ग्राहकाला संदेशात त्याची गोपनीय माहिती विचारत नाही. उदाहरणार्थ, पॅन कार्डशी संबंधित कोणतीही माहिती. वरीलपैकी कोणतीही मार्गाने मेसेज आला नाही तर अशा मेसेजवर आलेली लिंक उघडू नका.

कॉल आल्यास काय करावे?
अनोळखी नंबरवरून येणार्‍या कॉलबद्दलही तुम्ही सतर्क राहावे. जर कोणी अनोळखी नंबरवरून कॉल करून तुमचे बँकिंग तपशील विचारत असेल तर अशा कॉलपासून दूर राहा, असे बँकेने म्हटले आहे. या क्रमांकांची माहिती ताबडतोब बँकेला कळवा किंवा सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवा. यासाठी तुम्ही नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊ शकता. असे बनावट एसएमएस आणि कॉल ओळखण्यासाठी आरबीआयने एक पुस्तिका जारी केली आहे. Be Aware and Beware असे त्याचे नाव आहे. याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करताना अधिक काळजी घेण्याचा सल्लाही बँकेने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -