घरCORONA UPDATECoronavirus Lockdown: आता मोबाइल ATM द्वारे घरपोच 'कॅश' मिळणार

Coronavirus Lockdown: आता मोबाइल ATM द्वारे घरपोच ‘कॅश’ मिळणार

Subscribe

मुंबईकरांनो आता पैसे काढण्यासाठी दूरवर जाण्याची गरज नाही. घराजवळच मिळवा आपल्या खात्यातील पैसे

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलेला आहे. तसेच हा लॉकडाऊन काही राज्यांमध्ये आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन वाढल्यास लोकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी अडचण येऊ शकते. यातूनच एचडीएफसी बँकेने एक नवा पर्याय शोधला आहे. लोकांना घरबसल्या त्यांच्या खात्यातील पैसे मिळावेत यासाठी HDFC बँकेने मोबाइल एटीएम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या एटीएममधून खातेदार आपल्या घराजवळ आलेल्या एटीएम व्हॅनमधून पैसे काढू शकणार आहेत.

एचडीएफसी बँकेने याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये बँकेने सांगितले आहे की, “लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरीच सुरक्षित राहिले पाहीजे. पैशांसाठी त्यांनी लांब एटीएमपर्यंत येऊ नये, यासाठी आम्ही मोबाइल एटीएमद्वारे त्यांच्यापर्यंत पैसे घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहोत.”

- Advertisement -

HDFC बँकेची ही ATM Van मुंबईतील कोणकोणत्या भागात जाणार, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. बँकेचे अधिकारी आणि महानगरपालिका संयुक्तरित्या याबाबत निर्णय घेणार आहे. एखाद्या विभागात काही ठराविक वेळेसाठी मोबाइल व्हॅन जाऊन उभी राहिल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही व्हॅन विविध परिसरात फिरेल. या दरम्यान जवळ राहणारे खातेदार या व्हॅनमधून पैसे काढू शकतील.

- Advertisement -

एचडीएफसी बँकेचे थर्ड पार्टी प्रॉडक्ट्स ग्रुप हेड एस. संपतकुमार यांनी सांगितले की, “कोरोना व्हायरसमुळे देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. या कठीण काळात लोकांनी घरीच थांबावे, यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि परिणामी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही एटीएम व्हॅन काम करेल.”

भारतात कोरोनाचा आकडा आता झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या ५ हजार ७३४ वर पोहोचली आहे. तर १४९ लोकांचा आतापर्यंत बळी गेलेला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाने कहर केला असून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -