Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE धक्कादायक! कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला त्याने करकचून मिठी मारली आणि...!

धक्कादायक! कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला त्याने करकचून मिठी मारली आणि…!

Subscribe

कोरोनाचा धोका अधिक वाढला असतानाच अतिशय धक्कादायक घटना भिवंडीत समोर आली आहे. शहरातील कामतघर – आशीर्वाद नगर इथल्या ४५ वर्षीय रुग्णाचा ठाण्यातील कळवा इथे रुग्णालयात उपचारा दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनानं मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला असता नातेवाईकांनी भिवंडीतील घरी आणून मृतदेह खोलून मिठी मारून आपलं दुःख व्यक्त केलं. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अंत्यसंस्कारावेळी ५० ते ६० नातेवाईक उपस्थित होते. याची माहिती माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांना मिळताच त्यांनी मनपा आयुक्तांना याबद्दल सांगितलं आणि त्यांच्या पथकाने संपर्कात आलेल्या ४५ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मनपा आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांना तात्काळ सूचना देताच पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संपर्कात आलेल्या ४५ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं असून औषध फवारणी  करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अशा घटना चिंता वाढणाऱ्या आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारा वेळी जे नातेवाईक, नागरिक उपस्थित होते त्यांची लिस्ट तयार करण्यात आली असून त्यांचा शोध घेऊन त्यांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हा संपूर्ण  परिसर सील करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी  दिली आहे.

दरम्यान, भिवंडीत कोरोनाचे ३३ नवे रुग्ण समोर आले असून कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २५९  रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २५  रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.


- Advertisement -

हे ही वाचा – पोलिसाच्या बायकोने गळा चिरून मुलीची केली हत्या, नंतर स्वत: केली आत्महत्या!


 

- Advertisment -