घरमुंबईसावधान...आरोग्य शिबिरातील इंजेक्शन पडले भलतेच महागात

सावधान…आरोग्य शिबिरातील इंजेक्शन पडले भलतेच महागात

Subscribe

ठाणे येथे 'आरोग्य शिबिरा'तील उपचार एका महिलेला चांगलाच महागात पडल्याचे समोर आले आहे.

शहरात विविध ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित करुन रुग्णांवर मोफत उपचार किंवा कमी दरात उपचार केले जातात. तसेच या आरोग्य शिबिराला देखील मोठ्या संख्येने रुग्ण हजेरी लावतात. दरम्यान, ठाणे येथे ‘आरोग्य शिबिरा’तील धक्कादायक प्रकारानंतर आरोग्य शिबिरात जायचे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य शिबिरात उपचार घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात गुडघेदुखी आणि कंबरदुखीवर वैद्यकीय तपासण्या केल्या जात होत्या. दरम्यान, या शिबिरात उल्हासनगर येथील मंडप डेकोरेशन व्यवसायिकाची ५८ वर्षांची आई दोन वर्षांपासून गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहेत. त्यांनी अनेक उपचार करुन देखील त्यांचे दुखणे कमी नव्हते. त्यातच मागील वर्षी राजस्थानचा डॉक्टर फारूक हुसेन याच्याविषयी माहिती मिळाली होती की, हा डॉक्टर देत असलेल्या इंजेक्शनमुळे आराम पडतो, असेही व्यवसायिकाला समजले होते. त्यामुळे हा व्यावसायिक त्याच्या आईला २० डिसेंबर रोजी उल्हासनगरमध्ये आयोजित केलेल्या हुसेन याच्या आरोग्य शिबिरात घेऊन गेला होता.

- Advertisement -

या कॅम्पमध्ये इतरही अनेक रुग्ण उपचारासाठी आले होते. मुलाने आईच्या त्रासाबाबत डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरने महिलेला इंजेक्शन दिले. त्याचे ८०० रुपये शुल्क घेतले. १५ दिवसांत आराम पडेल, असेही डॉक्टरने सांगितले. परंतु महिलेला आराम पडण्याऐवजी इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी कमरेवर गाठ आली. महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गाठ काढली. या शस्त्रक्रियेसाठी ८० हजारांचा खर्च आला. आणखी एका जेष्ठ नागरिकावरही शिबिरात घेतलेल्या उपचारामुळे शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेला ८०० रुपये किंमतीचे इंजेक्शन ८० हजाराला पडले.

असा लागला आरोपीचा शोध

ही घटना पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र डॉक्टर कुठेच आढळून आला नाही. रविवारी त्याच डॉक्टरने टिटवाळा परिसरात गुडघे आणि कंबरदुखीवर आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र यावेळी आरोग्य शिबिरात फारुख उपस्थित नसल्याची माहिती मिळाली. परंतु त्याचे इतर सहकारी रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे डॉक्टरची कोणतीही पदवी नसल्याचे समोर आले. डॉक्टक असल्याची बतावणी करुन रुग्णांची फसवणूक करत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅम्पवर छापा टाकून राहुल सुवान खान, फारुख शहीदा रसिका आणि मोनू बाल मुकुंद या तिघांना अटक करण्यात आली असून ११ एप्रिलपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे.

- Advertisement -

वाचा – टिटवाळ्यामध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

वाचा – आरोग्य अहवालावर बोगस डॉक्टरची सही; गुन्हा दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -