घरCORONA UPDATECoronaVirus: वाडीया रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर

CoronaVirus: वाडीया रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर

Subscribe

वाडीया रुग्णालयात कोरोना कोविड- १९च्या कालावधीत डॉक्टर वगळता अन्य सर्व नर्सेस, वॉर्डबॉय तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर आहे.

परळमधील वाडीया रुग्णालयाने अनुदान मिळत नसल्याने कामगारांचा पगार रोखून धरत कामगारांच्या माध्यमातून एकप्रकारे आंदोलन करत थकीत अनुदानाची रक्कम महापालिकेकडून आपल्या तिजोरीत जमा करून घेतली. परंतु आता त्याच वाडीया रुग्णालयात कोरोना कोविड- १९च्या कालावधीत डॉक्टर वगळता अन्य सर्व नर्सेस, वॉर्डबॉय तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात नर्सेसना कोरोनाची बाधा झाल्याच्या काही बातम्या बाहेर आल्या असल्या तरी प्रत्यक्षात बाधितांचा आकडा मोठा आहे आणि ही आकडेवारी लपवत कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जात आहे. विशेष म्हणजे ओपीडीमध्ये तपासणाऱ्या नर्सेस, वॉर्डबॉय यांना पीपीई किट दिले जात नसून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणीही केली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

परळमधील नवरोजी वाडीया प्रसुती रुग्णालय आणि बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात नर्ससह आयाबाईला ला कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली. पण यापूर्वी ब्लड बँकमधील एका कर्मचाऱ्याला अशाप्रकारे पाच ते सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या कर्मचाऱ्याला घरी पाठवून होम क्वारंटाईन केले जाते. परंतु त्यांना रुग्णालयाकडून योग्यप्रकारे उपचार केले जात नसल्याची तक्रारी कामगार संघटनांकडून केली जात आहे.

- Advertisement -

या रुग्णालयात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णांची लपवाछपवी सुरु असून खुद्द कर्मचारी यामुळे नाराज आहे. ओपीडी किंवा अन्य वॉर्डामध्ये उपचार तसेच ब्लड बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आल्यामुळे  नर्सेससह आया बाई, वॉर्डबॉय, प्रयोगशाळेतील तांत्रिक कामगार आदींकडून कोरोनाची चाचणी करण्याची मागणी होत आहे. परंतु रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. शिवाय ओपीडीबरोबरच ब्लड बँकेसह प्रयोगशाळेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात अदृश्य कोरोना बाधित रुग्ण येत असल्याने पीपीई किट, हातमोजे देण्याची मागणी होत आहे. तीसुध्दा पूर्ण केली जात नाही. त्यातच कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना याची माहिती अन्य कामगार तसेच इतरांना न देण्याची तंबी दिली जात आहे. त्यामुळे आज जरी प्रत्यक्षात काही सहा ते सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची आकडेवारी दिली जात असली तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

या रुग्णालयात ओपीडी सुरु असून या नावे नोंदवलेल्यांसह कुणा डॉक्टरांनी शिफारस केलेले रुग्णही याठिकाणी येत आहे. त्यामुळे आधी त्यांची कोरोना तपासणी करून मगच त्यांना याठिकाणी दाखल केले पाहिजे. परंतु कोणत्याही रुग्णांची चाचणी न करता थेट दाखल करून घेतले जाते आणि मग तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असून याबाबत आपली चाचणी करावी म्हणून कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यानंतर तुम्हाला काही होणार नाही, असे उत्तर रुग्णालय व्यवस्थापनाकडून दिले जाते. त्यामुळेही कर्मचारी प्रत्येक दिवस भीतीच्या छायेखाली काढत असून अशाप्रकारे लपवाछपवी केली तरी सर्वच कर्मचारी कोरोनाबाधित होवून हे रुग्णालयच बंद होईल अशी भीतीही कर्मचारी व्यक्त करताना दिसत आहेत.

- Advertisement -

वाडीया रुग्णालयातील नर्स असलेल्या सुप्रिया लोंढे यांनी सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. ज्यामध्ये त्यांनी वाडीया रुग्णालयातील व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा व कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची योग्यप्रकारे काळजी घेत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त त्यांचा भांडाफोड केला. लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाबाधित रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या ३७ कर्मचाऱ्यांची चाचणी केली. त्यामुळे केवट आपणच पॉझिटिव्ह असल्याचा निरोप मेट्रन यांनी दिला आणि आपल्याला वॉर्ड क्रमांक १४ व १५ या भल्या मोठ्या वॉर्डात एकटे राहायला सांगितले. परंतु आपण नकार देताच आपण होम क्वारंटाईन व्हावे, असे सांगितले. घरात सासू-सासरे वयोवृध्द असल्याने त्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता त्यांना नायर रुग्णालयात दाखल केल्या आहे. मात्र, त्यांनी आपल्या व्हीडीओमध्ये ओपीडीमध्ये किंवा वॉर्डात काम करणाऱ्यांना पीपीई किट दिले जात नसल्याची बाबही अधोरेखित केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -