घरमुंबईमंकीपॉक्सविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले ...

मंकीपॉक्सविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले …

Subscribe

काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox) चर्चा सुरू आहे. देवी, कांजिण्यांप्रमाणेच मंकीपॉक्समुळे (Monkey Pox) अंगावर परळ उठत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिन आफ्रिकेत या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे भारतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

हेही वाचा – कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत

- Advertisement -

काळजी करण्याचे कारण नाही –

राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना भारतातील परिस्थिती आणि महाराष्ट्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती दिली आहे. मंकीपॉक्स (Monkey Pox) हा दक्षिण आफ्रिकेतून येणारा आजार आहे. ब्रिटन, अमेरिका या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या काही केसेस आढळल्या आहेत. माझे स्पष्ट सांगणे आहे की काळजी करण्याचे कारण नाही. एकही केस भारतात आढळलेली नाही. प्रादुर्भाव असलेल्या देशातून आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग केले जात आहे. काही लक्षणे आढळली तरी त्यांचे स्वब NIP ला पाठवतो. मुंबईत कस्तुरबा गांधी रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड आणि डॉक्टरांची टीम तयार आहे, असे राजेश टोपे म्हणाले. त्यांनी पुढे काही लक्षणं आढळत असतील, तर लोकांनी तपासणी करून घ्यावी. हवेतून प्रसार होत नसल्यामुळे लागण होण्याचे प्रमाण फार असू शकत नाही, असे आवाहन केले.

- Advertisement -

हेही वाचा – मंकीपॉक्स विषाणूबाबत मुंबई महापालिकेकडून अलर्ट जारी, कस्तुरबा रूग्णालयात २८ बेड्सचा स्वतंत्र वॉर्डही तयार

असा पसरतो विषाणू –

दरम्यान, मंकीपॉक्सचा विषाणू कसा पसरतो, याविषयी देखील राजेश टोपेंनी सविस्तर माहिती दिली आहे. हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. एक ते दोन दिवस पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता आहे, अशी माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -