घरमुंबईवेतनवाढीसाठी आरोग्य सेविकांचा धडक मोर्चा

वेतनवाढीसाठी आरोग्य सेविकांचा धडक मोर्चा

Subscribe

पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आज आरोग्य सेविकांनी पालिकेच्या परळ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनापुढे अनेकदा मागण्या मांडूनही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आरोग्य सेविकांनी परळ कार्यालयाला घेराव घातला. तसेच घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध केला.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिससारखे साथ आजार वेगाने पसरतात. या आजारांची घराघरात जाऊन माहिती देण्याचं काम पालिकेच्या आरोग्य सेविका करतात. मात्र, एवढं काम करूनही आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप आरोग्य सेविका करत आहेत. याच्या निषेधार्थ आरोग्य सेविकांनी गुरुवारी महापालिकेच्या परळ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनापुढे अनेकदा मागण्या मांडूनही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आरोग्य सेविकांनी आज परळ कार्यालयाला घेराव घातला. तसेच घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध केला.

“आरोग्य सेविकांना कायमस्वरुपी पदावर रुजू करुन घ्या, असा हायकोर्टाने निर्णय दिला होता. पण, आम्हाला अजूनही कसल्याही प्रकारचा निर्णय देण्यात आला आहे. आमची फरफट केली जात आहे. सर्व कामांसाठी आरोग्य सेविका पुढे असतात. स्वत: चा विचार न करता आम्ही काम करत असतो. पण आमच्या कामाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. “
– वैशाली भोसले, आरोग्य सेविका

पालिका प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा आरोग्य सेविकांनी दिला आहे. मुंबई शहरासाठी सध्या ७२ आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यात एकूण ४ हजार आरोग्य सेविका काम करतात. या आरोग्य सेविकांना महिन्याला फक्त ५ हजार रूपये मानधन दिलं जातं. पण ५ हजारांवरुन किमान १२ हजार रूपये पगार मिळावा, अशी मागणी आरोग्य सेविकांनी केली आहे.

“पेन्शन, पीएफ, सेवेत कायम ठेवा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आरोग्य सेविका आपला जीव धोक्यात घालून झोपडपट्टीत जाऊन विविध आजारांबाबत जनजागृती करतात. आजार पसरू नये, लोकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करतात. पण, पालिकेकडून त्यांना कोणतीही सुरक्षा दिली जात नाही. आरोग्य सेविकांना त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदलाही प्रशासन देत नाही.”
– मिलिंद पारकर, सहसचिव, आरोग्य सेविका संघटना

- Advertisement -

जानेवारी २०१७ मध्ये हायकोर्टाने आरोग्यसेविकांना कायमस्वरुपी पदावर रुजू करून घ्या, असा निर्णय दिला होता. मात्र पालिकेने त्याला विरोध करत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पाठवलं, असं ही आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं.

demand of health workers
आरोग्य सेविकांच्या मागण्या

या आहेत प्रमुख मागण्या

  • पूर्ण वेळ कामगार म्हणून महापालिकेत सामावून घेणे
  • महापालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सर्व सेवा शर्थी लागू कराव्यात
  • निवृत्त आरोग्य सेविकांना १२ हजार रुपये वेतन द्यावे
  • एबिट किटक नाशक टाकण्याचे काम आरोग्य सेविकांना देऊ नये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -