घरमुंबईआज हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी

आज हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी

Subscribe

आज हाटकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यापूर्वी १४ ऑगस्टला ही सुनावणी होणार होती. मात्र राज्यात वाढलेल्या आंदोलनाच्या हिंसक वळणामुळे ही सुनावणी सात दिवस आधी घेण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातच नव्हे तर देशभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनाने काही जिल्ह्यांमध्ये हिंसक वळणही घेतले. या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आज, मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनकर्त्यांच्या वतीने कोर्टात याचिका दाखल केली असून आंदोनलानाच्या काळात तब्बल सात तरूणांनी आत्महत्या केल्यामुळे लवकरात लवकर या याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती हायकोर्टाकडे केली होती.

सुनावणी सात दिवस आधी घेतली 

कोर्टात सकाळी ११ वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आज हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाकडून ३ ऑगस्टला एक पानी स्टेटस रिपोर्ट राज्य सराकरला सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार होती. मात्र याचिकार्त्यांच्या मागणीनुसार ही सुनावणी सात दिवस अगोदर ठेवण्यात आल्याने यावर आज हायकोर्टात सुनावणी होत आहे.

- Advertisement -

दिल्लीतही बैठका झाल्या 

दरम्यान, काल दिल्लीतही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली होती. रात्री उशीरा राज्यातील भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी राज्यात मराठा, धनगर इतर समाजांच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे आणि भाजप खासदार उपस्थित होते. तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांच्यात संध्याकाळी तब्बल दीड तास चर्चा झाल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -