घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेवर होणार सुनावणी; गौरी भिडेंची याचिका मंजूर

उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेवर होणार सुनावणी; गौरी भिडेंची याचिका मंजूर

Subscribe

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडी कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून (bombay high court) निश्चित झाले आहे. गौरी भिडे यांनी या संदर्भात ८ डिसेंबर रोजी याचिका दाखल केली होती. दरम्यान न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा – राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

उद्धव ठाकरे (uddhav thackeray)आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप गौरी भिडे यांनी केला आहे. त्याच सोबत उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडी कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

हे ही वाचा – बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे माझ्यावर कारवाई, संजय राऊतांचे न्यायालयात शपथपत्र

- Advertisement -

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप आरोप केला. गौरी भिडे (gauri bhide) यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. २२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गौरी भिडे यांनी नव्या खंडपीठापुढे धाव घेतली आहे.

हे ही वाचा – ताईला सगळं माहितीय…; ‘त्या’ गुन्ह्याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीटमधून नक्की कोणावर केले आरोप?

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -