घरमुंबईमान्सूनच्या विलंबामुळे महाराष्ट्रात जूनमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता

मान्सूनच्या विलंबामुळे महाराष्ट्रात जूनमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Subscribe

मुंबई : यावर्षी 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनची प्रगती कशी होते यावर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे जूनमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. (Heat wave forecast in Maharashtra in June due to delay in monsoon)

मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला असला तरी यावेळी विलंब झाला असल्यामुळे दरवर्षी केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यंदा मात्र उशीरा पोहचणार आहे. त्यामुळे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे जूनमधे सरासरीच्या कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना जुनच्या सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -