पार्ल्यातील लाभ श्रीवाली इमारतीला आगपार्ल्यातील लाभ श्रीवाली इमारतीला आग

अडकलेल्या ४ जणांना सुरक्षित बाहेर काढले

Heavy fire in building outside vileparle railway station
विलेपार्ले स्टेशनबाहेरील इमारतीला भीषण आग

विलेपार्ले पश्चिम येथील बजाज रोड वर असलेल्या तेरा मजली लाभ श्रीवाली इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर रविवार संध्याकाळी आगीची दुघर्टना घडली. या आगीमध्ये अडकलेल्या चार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. मात्र, ही आग दीड तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे

विलेपार्ले पश्चिम येथील बजाज रोडवरील कपोल बँकसमोरील तळ अधिक १३ मजली दोन विंगची लाभ श्रीवाली इमारत आहे. या इमारतीच्या ए विंगमधील ७व्या मजल्यावर सायंकाळी ७ वाजता प्रथम आगीची घटना घडली होती. त्यानंतर आग आठव्या मजल्यापर्यंत पसरली गेली. परंतु आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मजल्यावर पसरलेली आग विझवण्याचा शर्थीने प्रयत्न केला. यावेळी ए विंगमधील सातव्या मजल्यावर ४ जण अडकल्याची माहिती मिळतात, त्या सर्वांना जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर बी विंगमधील ८ व्या मजल्यावर अडकलेल्या महिलेलाही सुरक्षित बाहेर काढण्यात जवानांना यश आले.ही आग अधिक पसरु न देता दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.