Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे Mumbai Rain: मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार बॅटींग, पुढील ३-४ तासात मुंबईसह पाच...

Mumbai Rain: मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार बॅटींग, पुढील ३-४ तासात मुंबईसह पाच जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई लोकलवर पावसाचा कोणताही परिणाम झालेला नाही.

Related Story

- Advertisement -

राज्यात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याप्रमाणे मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार बॅटींग करायला सुरुवात केली आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील ३-४ तासात मुंबईसह ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी जिल्ह्याला  अलर्ट जारी करण्यात आला असून विजांचे कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेय. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पूर्व -पश्चिमेकडून वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज साधारण ६४ मिमी ते २०० मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या दादर,सायन,माटुंगा,वांद्रे परिसरात पाऊस सुरू आहे. रात्री पासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील या महत्त्वाच्या सखल भागात कुठेही पाणी साचलेले नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तसेच नवी मुंबई,पनवेलमध्ये देखील सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे.

मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू असला तरी त्याचा परिणाम मुंबईची लाईफ लाइन असलेल्या मुंबई लोकलवर झालेला नाही. मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सुरळीत सुरू आहे. मात्र पावसामुळे मुंबईच्या अनेक रस्त्यांवर पावसामुळे वाहनांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे.


हेही वाचा – Maharashtra Monsoon: महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

- Advertisement -