Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपलं; अनेक ठिकाणी पाणी साचलं

मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपलं; अनेक ठिकाणी पाणी साचलं

Related Story

- Advertisement -

मुंबईसह उनगरामध्ये मान्सूनने दमदार एन्ट्री केली आहे. रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मान्सूनचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागांत बरसतोय. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत.

मुंबईला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडतोय, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -