घरमुंबईमुंबई परिसरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवस आरेंज अलर्ट

मुंबई परिसरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवस आरेंज अलर्ट

Subscribe

मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सकाळी कामावर जाणारे चाकरमानी, शाळकरी मुलांना पावसातूनच मार्ग काढत जावे लागत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सखल भागात पाणी साचले –

- Advertisement -

सोमवारी सायंकाळ पासून पवासाने जोर धरला आहे. त्यामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल, लोअर परळ, शीव, धारावी, वांद्रे, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, काळाचौकी, अंधेरी, दहिसर, बोरिवली, गोरेगाव, सांताक्रूझ यासह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सखलभागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी बसविलेले पाणी उपसा करणारे पंप मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहेत. दरम्यान २४ तासांत सांताक्रूझमध्ये १२४.२ मिमी, कुलाब्यामध्ये ११७.४ मिमी, सीएसएमटी ९५ मिमी, भायखळा ९२.५ मिमी, चेंबूर ९९.५ मिमी, माटुंगा ०.५ मिमी, शीव ६६ मिमी, विद्याविहार ९९ मिमी, जुहू विमानतळ १०१.५ मिमी, मुंबई विमानतळ ९४ मिमी पावसाची नोंद झाली.

 

- Advertisement -

एनडीआरएफच्या टीम तैनात –

मुंबई सह उपनगरात एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. मुंबई आणि राज्यातील इतर शहरात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असल्याने तातडीने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व विभाग अलर्ट असून समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. सगळ्यांनी आपआपली तयारी काय काय़ आहे हे बैठकीत सांगितली आहे. याशिवाय ज्या काही इजन्सी आहेत त्यांच्या टीम देखील वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज ठेवल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांचे नुकसान होणार नाही. दरड कोसळून दुर्घटनेची ठिकाणं ट्रॅक केली आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासह, काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांच्या जेवणची, राहण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही नागरिकाला अडचण येऊ नये आणि त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले दिली

लोकल सेवेला फटका – 

मुंबईच्या दोन्ही मार्गावरील लोकल सेवेला पावसाचा फटका बसला आहे. मध्य आणि हार्बल रेल्वेची वाहतूक विस्कळीत. पश्चिम मध्य आणि हार्बरवरील सेवेवर पावसाचा परिणाम झाला आहे. माटुंगा आणि हार्बर रेल्वे रुळावर साचले पाणी आहे.

 

 

 

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -