ठाण्यात २४ तासात पावसाची दमदार हजेरी; ८३.८१ मिमी पावसाची नोंद

ठाणे (Thane) शहरात मागील चोवीस तासात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ८३.८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शहरातील राबोडी परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला. तसेच दोन ठिकाणी पाणी साचले होते, शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणी झाडे कोसळली असून सहा ठिकाणी झाडांच्या फांदया तुटून पडल्या आहेत.

Regional Meteorological Centre Mumbai issues weather warning for the next 5 days for Maharashtra.

ठाणे (Thane) शहरात मागील चोवीस तासात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ८३.८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शहरातील राबोडी परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला. तसेच दोन ठिकाणी पाणी साचले होते, शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणी झाडे कोसळली असून सहा ठिकाणी झाडांच्या फांदया तुटून पडल्या आहेत. (Heavy rains in Thane in 24 hours Record rainfall of 83 81 mm)

तीन ठिकाणची झाडे धोकादायक स्थित आलेली आहेत. त्याचबरोबर इतर ही ४ तक्रारी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडे आलेल्या आहेत. गुरुवार प्रमाणे शुक्रवारी पावसाच्या सरी येऊन जाऊन आहेत. गुरुवारी सकाळी ८.३० पासून शुक्रवारी सकाळी ८.३० अशा चोवीस तासात ठाणे शहरात ८३.८१ मिमी अशी पावसाची नोंद ही झाली आहे. तर आतापर्यंत ठाणे शहरात ३२३ मिमी पाऊस झालेला आहे. गतवर्षी या दिवशी १ हजार १२९.०६ मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा पाऊस जरी कमी झालेला आहे.

मुंबईत (Mumbai) शुक्रवार सकाळपासूनच वाऱ्यासह जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने रस्ते वाहतुकीसह (Road Transport) रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे. तसेच, रेल्वेच्या पश्चिम (Western railway) आणि मध्ये रेल्वे (Central Railway) मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

मुंबईत गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८.३० पर्यंत बारा तासात कुलाबा १७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, सांताक्रुजमध्ये १३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम