अरबी समुद्रात पवन हंस हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; 4 जणांचा मृत्यू, 5 जणांवर उपचार सुरु

मात्र या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग कोणत्या परिस्थितीत झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

helicopter makes an emergency landing in arabian sea near ongc rig sagar kiran in mumbai

ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टरचे मुंबईजवळील अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहेत. सात प्रवासी आणि दोन पायलटला घेऊन हे हेलिकॉप्टर ओएनजीसीच्या रिग सागर किरणवर जात होते, मात्र अचानक काही कारणास्तव या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 5 जणांवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरु केले. यावेळी रेक्स्यू ऑपरेशनदरम्यान हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिमेकडील सागर किरण या ऑइल रिगजवळ हा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दरम्यान हेलिकॉप्टरमधील सातही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मुंबई समुद्राच्या पश्चिमेला 60 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या सागर किरण या ऑइल रिगजवळ हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आतापर्यंत नऊ पैकी चार जणांचा मृत्यू झाला असून 5 जणांवर उपचार सुरु आहेत.


पीआरओ डिफेन्स मुंबईच्या माहितीनुसार, सर्व नऊ प्रवाशांची सुटका करण्यात आली. यातील चार जणांना ओएसवी मालवीय 16, एकाला सागर किरण रिगच्या बोटीने आणि दोन दोन लोकांना भारतीय नौदलाच्या एएलएच आणि सीकिंग हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले आहे. ओएनजीसी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी चार जणांना नौदलाच्या हेलिकॉप्टरने जुहू येथे नेण्यात आले. मात्र गंभीर प्रकृतीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

मात्र या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग कोणत्या परिस्थितीत झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ONGC कडे अरबी समुद्रात अनेक रिग आणि प्रतिष्ठाने आहेत ज्यांचा वापर समुद्रसपाटीपासून खाली असलेल्या जलाशयांमधून तेल आणि वायू निर्मितीसाठी केला जातो. बचाव मोहिमेदरम्यान हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाच्या विमानांनी लाइफ राफ्ट्स खाली पाडले. हे MRCC ने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुरक्षा जाळ्या आहेत. बचाव कार्यात तटरक्षक दल नौदल आणि ओएनजीसी यांच्याशी समन्वय साधला.


मुलांनी मुलीसोबतच्या मैत्रीला सेक्ससाठीची संमती मानू नये, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय