घरताज्या घडामोडीदुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक; वाहतूक विभागाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक; वाहतूक विभागाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

Subscribe

दुचाकी चालवणाऱ्या चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आता दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून, 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

दुचाकी चालवणाऱ्या चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आता दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai traffic police) हा आदेश काढला असून, 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला पुढच्या 15 दिवसात हेल्मेट वापरणे बंधनकारक असेल. त्यामुळे आता दुचाकी चालवताना दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.

वाहतूक विभागाकडून (Traffic Department) पुढील 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. दुचाकीलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वाहतूक नियम मोडण्यात राजकीय नेते अग्रेसर; उपमुख्यमंत्र्यांनी भरला 27,800 रुपयांचा दंड

- Advertisement -

वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, मोटार सायकलस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांनी हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या 15 दिवसानंतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सुचना वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, अनेकदा दुचाकीस्वार या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे लागते. अशातच आता, चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.


हेही वाचा – ‘येवा कोकण आपलोच नसा’; तारकर्ली दुर्घटनेनंतर साताऱ्याच्या वकील सुचित्रा घोगरे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -