घरताज्या घडामोडीMission Zero: चला, मुंबईला कोविडमुक्त करूया!, BMCचं मुंबईकरांना आवाहन

Mission Zero: चला, मुंबईला कोविडमुक्त करूया!, BMCचं मुंबईकरांना आवाहन

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत एकेकाळी कोरोनाने धुमाकूळ घातला होतो, त्या मुंबईत आता कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून सध्या २८ हजारांहून अधिक रुग्ण सक्रिय आहेत. यामुळे मुंबईने जगातील साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. केंद्रापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक जणांनी मुंबई महापालिकेच्या मुंबई मॉडेलचे कौतुक केले आहे. ऑक्सिजन व्यवस्थापनेपासून ते कोरोनावर नियंत्रण आणण्यापर्यंत मुंबई मॉडेल यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. आता मुंबईला कोरोनामुक्त करण्याचे आव्हान महापालिकेचे आहे. यामुळे महापालिकेने मुंबईकारांना मुंबईला कोरोनामुक्त करण्यासाठी आवाहन केले आहे. याबाबतचे ट्वीट महापालिकेने अधिकृत ट्वीट अकाउंटवर पोस्ट केलं आहे. ‘मिशन झिरो’ यशस्वी करण्यासाठी काय करावे लागले? याबाबत महापालिकेने सांगितले आहे.

महापालिकेच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘चला मुंबईला कोविडमुक्त करुया. आता मुंबईकरांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य आहे. कोरोनाविषयी अद्ययावत माहिती मिळविण्याकरिता http://stopcoronavirus.mcgm.gov.in ला भेट द्या.’ ‘सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवून ‘मिशन झिरो’च्या दिशेने मुंबई वेगाने प्रवास करीत आहे. मात्र काही काळ नियमांचे काटेकोर पालन करून मुंबईत कोविड मुक्त बनवूया. अत्यावश्यक सेवांना ‘मिशन झिरो’मध्ये पूर्ण साथ देऊन आपणही ‘हिरो’ बनूया, असे म्हणत मुंबईकरांना महापालिकेने आवाहन केलं आहे.’

- Advertisement -

‘मिशन झिरो’ यशस्वी करण्यासाठी

  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना ‘मास्क’चा योग्य वापर करा.
  • साबणाने अथवा ‘सॅनिटायझर’ने हात वारंवार स्वच्छ धुवा.
  • ‘कोविड’ सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरित स्वतःला विलग करा.
  • वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या
  • सुरक्षित अंतराचे पालन करा.
  • ‘कोविड’ लसीबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका.

बीकेसी कोविड सेंटरमध्ये तब्बल ११३४ डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची टीम

मुंबई महापालिकेच्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल १ हजार १३४ डॉक्टर,वैद्यकीय सल्लागार, तंत्रज्ञ, नर्स, वार्डबॉय, रुग्ण सहाय्यक आदींची टीम २४ तास कार्यरत आहे. तर बीकेसी सेंटर उभारल्यापासून आतापर्यंत तब्बल २१ हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -