घरताज्या घडामोडीUber कडून वृद्धांना मोफत प्रवासाची सुविधा; HelpAge India चा स्तुत्य उपक्रम

Uber कडून वृद्धांना मोफत प्रवासाची सुविधा; HelpAge India चा स्तुत्य उपक्रम

Subscribe

हेल्प एज इंडिया (HelpAge India) आणि उबर (Uber) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. कोरोना महामारीमुळे लोकांच्या प्रवासावर बंधने आली आहेत. मुंबई लोकल बंद असल्यामुळे बसेसवर ताण आलाय. त्यामुळे ज्येष्ठ आणि वृद्धांना रुग्णालय, बँक किंवा इतर अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या समस्येतून त्यांची मुक्तता करण्यासाठी हेल्प एजने उबर समोर ज्येष्ठांना फ्री राईड देण्याचा प्रस्ताव मांडला. उबरनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली असून. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० या तीन महिन्यांसाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठांना मुंबई शहरात उबरकडून फ्री राईड म्हणजेच मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

१ ऑक्टोबर २०२० हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा दान उत्सव म्हणून साजरा होतो. या दोन्ही दिनविशेषाचे औचित्य साधत हेल्प एज आणि उबरने आपण समाजेचे काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. तीन महिन्यांसाठी मुंबईसहीत अहमदाबाद, बंगळुरु, भोपाल, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोची, कोलकाता आणि लखनऊ शहरांमध्ये फ्री राईड सर्विस देण्यात येणार आहे.

- Advertisement -

या सेवेचा लाभ कसा घ्याल?

– मुंबई शहर आणि उपनगरात तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर हेल्प एज इंडियाचा हेल्पलाईन नंबर 1800 180 1253 वर कॉल करा. (HelpAge India elder’s helpline)

– रिंग पुर्ण झाल्यानंतर काही वेळाने एल्प एजच्या प्रतिनिंधीकडून तुम्ही ज्या मोबाईलवरुन कॉल केला होता, त्यावर फोन येईल.

- Advertisement -

– समोरून फोन आल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती मदत हवी आहे? हे सविस्तर सांगायचे आहे.

– उबरची फ्री राईड हवी असल्यास, तशी माहिती प्रतिनिधींना द्या. ते तुमच्या राईडबद्दल उबरशी समन्वय साधतील.

हेल्प एज इंडियाचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे प्रमुख प्रकाश बोरगावकर यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, कोरोना काळात प्रवासाच्या अडचणी लक्षात आल्यानंतर या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या फ्री राईडचा लाभ घेण्यासाठी मास्क अनिवार्य असणार आहे. मास्कशिवाय फ्री राईड मिळणार नाही. तसेच उबर कडून सध्या महिन्याला ९० फ्री राईड मिळणार आहेत. या सेवेचा प्रतिसाद पाहिल्यानंतर आणखीही काही उपक्रम राबविण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

हेल्प एज संस्थेत ३२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या बोरगावकर यांनी हेल्प एजच्या कार्याबद्दलही माहिती दिली. ही संस्था ४२ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहे. गरिब, निराधार वृद्धांसाठी विविध योजना आतापर्यंत संस्थेने उपलब्ध करुन दिल्या आहेत. मोबाईल रुग्णवाहिका, ज्येष्ठांना मोफत वैद्यकीय सुविधा देतो, दरवर्षी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन अशा अनेक सुविधा दिल्या जातात. कोरोनाकाळात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोफत रेशन वाटप, तयार जेवणाची पाकीटे ज्येष्ठ निराधार नागरिकांना देण्यात आल्याचे बोरगावकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -