घरमुंबईनवी मुंबईतील वेअरहाऊसमधून तब्बल १३२० कोटींचे हेरॉइन जप्त

नवी मुंबईतील वेअरहाऊसमधून तब्बल १३२० कोटींचे हेरॉइन जप्त

Subscribe

पनवेल परिसरातील एका वेअरहाऊसमधून १३० किलोंचे आणि तब्बल १३२० कोटी रुपयांचे हेरॉइन शुक्रवारी जप्त करण्यात आले.

पनवेल परिसरातील एका वेअरहाऊसमधून १३० किलोंचे आणि तब्बल १३२० कोटी रुपयांचे हेरॉइन काल, शुक्रवारी जप्त करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण ३३० किलो हेरॉइन पनवेल परिसरातून जप्त करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात केली आहे.

इराणमधून आला होता साठा 

इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा उरण येथील जेएनपीटी येथे पाठवण्यात आला होता. समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉइनचा साठा भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती अनेक दिवसांपासून होती. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही शुक्रवारी कारवाई केली आणि मोठा साठा जप्त करण्यात आला. पनवेल तालुक्यातील हद्दीमध्ये वेअरहाऊसची संख्या जास्त आहे. यामुळेच येथे हेरॉइन साठवून ठेवण्यात येत होती. पळस्पे येथील एका वेअरहाऊसमध्ये हे हेरॉइन २६० गोण्यांमध्ये भरलेले होते. या सर्व गोण्या एका कंटेनरमध्ये लपवल्या होत्या. या वेअरहाऊसमधून दोन इसमांना अटकही करण्यात आली आहे.

- Advertisement -

सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

अटक केलेल्यांपैकी एक आरोपी दिल्लीचा तर दुसरा आरोपी हा कंधार, अफगाणिस्तानचा रहिवासी आहे. हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती मिळते आहे. याप्रकारामागे एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आतापर्यंत रस्त्याच्या मार्गाने हेरॉइनची तस्करी होत होती. पण आता तस्करांनी समुद्र मार्गाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. पंजाबमध्ये ५३२ किलो ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर आता सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -