Friday, June 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी High Alert : रविवारीही पावसाला सुट्टी नाहीच; मुंबईत दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

High Alert : रविवारीही पावसाला सुट्टी नाहीच; मुंबईत दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

समुद्र किनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसरात जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर राज्यातील बहुतांशी जिल्हांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईमध्येही मागील काही दिवस पावसाची धो-धो सुरु असून येत्या दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, १३ आणि १४ जूनला म्हणजेच येत्या रविवार आणि सोमवारी मुंबई शहर व उपनगरातील काही भागांमध्ये ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसरात जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे.

मागील तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसाने मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत मागील तीन दिवसांत विविध ठिकाणी जवळपास १४० ते २४० मिली पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातच आता येत्या रविवार आणि सोमवारी मुंबई शहर व उपनगरातील काही भागांमध्ये ‘अतिवृष्टी’चा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला आहे. पालिकेचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष हे आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवले आहेत. पालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांनाही मदतीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या असून त्वरीत मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.

- Advertisement -