घरमुंबई...राज्यपालांच्या नेतृत्वाखाली मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार - उदय...

…राज्यपालांच्या नेतृत्वाखाली मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार – उदय सामंत

Subscribe

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. यावेळी तबला वादक पद्मभूषण झाकीर हुसेन आणि उद्योजक शशिकांत गरवारे यांना डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गरवारे यांना समारंभात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या वतीने त्यांच्या मुलीने मानद पदवी स्वीकारली. दीक्षांत समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी उदय सामंत आणि राज्यपालांनी एकमेकांना राजकीय कोपरखळ्या दिल्या.

राज्यपाल महोदय असताना मी येतो की नाही, असा कुलगुरूंना वाटत होते. मात्र, शिक्षण क्षेत्र पुढे नेण्यासाठी राज्यपालांच्या नेतृत्वाखाली सदैव मी काम करायला तयार आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला तयार आहे, त्यामुळे राज्यपाल असतील तेंव्हा उदय सामंत कार्यक्रमला येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी एक कोटींची तरतूद करून कोनशिलेचे उद्घाटन करून दिड वर्ष उलटली, मात्र, तिथे अद्यापही काम सुरू झालेले नाही, त्यामुळे तातडीने हे काम सुरू व्हावे यासाठी आपण एकत्र येऊन काम करू असे उदय सामंत आपल्या भाषणात म्हणाले.

- Advertisement -

राजनीती मध्ये आलेला प्रत्येकाला वाटते की मी सगळ्यांच्या पुढे जावे आणि बाकी सगळे मागे राहावेत. मात्र, शिक्षकांचे तसे नसते, त्यांना वाटते आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा. पुढे जावा. निष्ठा, नियमांचे पालन, शिस्तमुळे आपली प्रतिभा विकसित केली जाऊ शकते. राज्यपालांचे काम, रोल मर्यादित असतो. राज्यपाल फक्त नावाला असतो, बाकी सगळे काम सरकार, मंत्री करतात. ते काम करताय, महाविद्यालय उभे करताय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अजून ताकदीने ते काम करतील असे सांगत राज्यपालांनी उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान ऑफलाइन परीक्षा संदर्भात विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांमध्ये काही संभ्रम आहेत. मी सांगितले आहे की, शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या लवकरात लवकर व्हायला हव्यात आणि इतरच्या परीक्षा येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण व्हाव्यात. असे उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -