राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवू नका, भास्कर जाधवांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन

राज ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत अशी टीका करत 'अयोध्येला जाण्यापासून राज ठाकरेंना कोणी थांबलं होत' असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची खिलली उडवली होती. अयोध्या दौऱ्याला एक खासदार विरोध करत असेल तर राज ठाकरेंनी त्यावर ठाम भूमिका घ्यावी, अशी राऊत म्हणाले.

Raj Thackeray appeal all people about Let's tear down mosque loudspeaker issue
एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, औरंगाबाद नंतर २२ मे रोजी पुण्यात जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये राज ठाकरेंनी अयोध्या दौरा, राणा दाम्पत्य, हनुमान चालीसा, औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर व्हावं, समान नागरी कायदा या सारखे काही महत्वाचे मुद्दे मांडले होते.  पुण्याच्या सभेतील अयोध्येच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवत ‘तुम्हाला अयोध्येला जाण्यापासून कुणी रोखलं’ असा सवाल केला. मात्र शिवसेनेचेच आमदार संजय भास्कर यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवू नये असे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या २२ तारखेच्या पुण्याच्या सभेत जे भाषण केले त्यात अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्या विरोधात ट्रॅप लावण्यात आला असे सांगितले. अयोध्या दौरा का रद्द केला याचं कारण सुद्धा स्पष्ट केले. त्यांनतर राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत मातोश्री ही काय मशीद आहे का असा प्रश्न ही केला. त्याचबरोबर राज्यात समान नागरी कायदा आणावा, औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर करावे अशी विनंती सुद्धा सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे बोट दाखवत भाजपावरही टोला लगावला आहे. मनसेच्या आधीच्या आणि आताच्या भोंग्यांच्या आंदोलनाला आलेलं यश याचीही आठवण करून दिली आणि हे आंदोलन असंच यापुढेही सुरु राहील असे ही सांगितले. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवर ओवैसी नतमस्तक होतो आणि महाराष्ट्र थंडपणे बघत बसतो यावर खंतही व्यक्त केली. आणि त्याच बरोबर औरंगजेबाच्या कबरीच्या विस्तारासाठी फंडिंग कोण करतं आई ते कुठेऊं येतं असा खरमरीत सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. महाविकास आघाडी बरोबर राहून बाळासाहेबांची प्रतिष्ठा शिवसेना संपवते आहे अशी बोचरी टीका सुद्धा राज यांनी भाषणात केली.

राज ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत अशी टीका करत ‘अयोध्येला जाण्यापासून राज ठाकरेंना कोणी थांबलं होत’ असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची खिलली उडवली होती. अयोध्या दौऱ्याला एक खासदार विरोध करत असेल तर राज ठाकरेंनी त्यावर ठाम भूमिका घ्यावी, अशी राऊत म्हणाले. त्याच बरोबर राज ठाकरे हे हिंदुत्ववादी ओवैसू आहेत, अशी खरमरीत टीका सुद्धा राऊतांनी राज ठाकरेंवर केली. औरंगजेबाच्या कबरींसंदर्भात जो काही निर्णय घायचा असेल तो केंद्र सरकारने घ्यावा असंही राऊत यांनी सांगितले. राज यांना मातोश्रीनेच मोठं केलं अशी आठवण करून देत. ‘तुम्ही हिंदुत्वाची शाल कधी पांघरली’ असा प्रश्न सुद्धा राऊतांनी विचारला. राऊतांसह महाविकास आघडीतील अनेक नेत्यांनी करमणूक सभा म्हणून राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली.

या सर्व प्रकारावर शिवसेनेचेच आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेची खिल्ली उडवू नका, त्यांना हिणवू नका आणि त्यांचं भाषण गांभीर्याने घ्या असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं. हे भाषण राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आणि वैचारिक पद्धतीचं होतं या शब्दात भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंचं कौतुक सुद्धा केलं. राज यांच्या भाषणातील मुद्दे हे सगळ्यांनीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यांच्या भाषणाच्या विषयाची कुणीही चेष्टा करू नये असं आवाहनही भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना केलं. एक परिपक्व आणि मुद्देसूद भाषण म्हणून या भाषणाकडे पाहण्याची गरज आहे असं भास्कर जाधव म्हणाले.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलेली  प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भास्कर जाधव यांनी ही भूमिका का घेतली, राज ठाकरेंचा मुद्दा त्यांना खरंच पटला की या मागे सुद्धा काही राजकीय गणितं आहेत हे काही दिवसात कळेल. आणि राज ठाकरे सुद्धा यावर काय प्रतिक्रिया देणार हे महत्वाचं आहे.