घरमुंबईमुंबईत पावसाची जोरदार हजेरी ४ वाजता हायटाईड

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी ४ वाजता हायटाईड

Subscribe

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही पाऊस

रविवारी पडलेल्या रिमझिम पावसानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही पावसाची दमदार सुरूवात झाली आहे. सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, वरळी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, ठाणे, डोंबिवली, सायन, घाटकोपर,वसई, नालासोपारा अशा अनेक परिसरांमध्ये सध्या पाऊस पडतो आहे. तर, लोअर परळच्या रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचलं आहे. वरळी सी-लिंक परिसरातही जोरदार पाऊस पडत असून समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत.

सध्या मुंबईत ढगाळ वातावरण

सकाळी ७.४५ वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे, प्रवास करणाऱ्यांना चाकरमान्यांनाही त्रास सहन करावा लागला आहे. एखादी जोरदार सर मध्येच पावसाची विश्रांती, पुन्हा मोठी सर असा श्रावणात पडणारा असा पाऊस मुंबईकर अनुभवत आहेत. दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागातही पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्या सरी पडत आहेत. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हिंदमाता परिसरात पाणी साचले

मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस पडत असल्याने लालबाग, हिंदमाता, परळ आणि हिंदमाता या परिसरात पाणी साचले असून शहरातील सखल भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. दुपारी चार वाजता भरतीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हिंदमाता पुन्हा पाण्याखाली…

हिंदमाता पुन्हा पाण्याखाली…

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಜುಲೈ 7, 2019

- Advertisement -

४ वाजता हायटाईड 

तर, हवामान खात्याने दिवसभर पाऊस पडणार नसल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तसंच, दुपारी चार वाजता भरतीचा इशाराही देण्यात आला आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत कुलाब्यात ५४.२ मिमी आणि सांताक्रूझमध्ये ३०.६ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसंच, मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. सकाळपासून पडलेला पाऊस जर कायम राहिला तर मुंबईकरांना समस्या उद्भवू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -