घरमुंबईआजपासून वांद्रे वरळी सी लिंकवर वाहनचालकांना मोजावा लागणार अतिरिक्त टोल !

आजपासून वांद्रे वरळी सी लिंकवर वाहनचालकांना मोजावा लागणार अतिरिक्त टोल !

Subscribe

टोल वसूलीमध्ये १३ वर्षांची वाढ

मुंबईतील बांद्रा वरळी सी लिंकवरील प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांना बांद्रा वरळी सी लिंकवरुन प्रवास करताना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच कार बाईकसारख्या लहान वाहानांसाठी १५ ते ८५ रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात आला आहेत. तर मोठ्या आणि अवजड वाहनांसाठी ७० रुपये टोल वाढवण्यात आला आहे. टोलच्या दरात वाढ झाल्यामुळे बांद्रा-वरळी सी लिंकवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

बांद्रा वरळी सी लिंकवरुन परतीचा प्रवास केल्यास पुर्वी १०५ रुपयांचा टोल भरावा लागत होता परंतु आजपासून हा टोल १२७.५ रुपयांचा असेल. ट्रक चालकांसाठी १७५ रुपये मोजावे लागणार आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक कमलाकर फंड यांनी म्हटले आहे की, टोलच्या दरात वाढ नवीन नसून नियमित आहे. तीन वर्षानंतर शासनाच्या अधिसूचनेनुसार टोलच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वांद्रे वरळी सी लिंकवर टोलकनाक्यावर टोलवसूलीची मुदत २०३९ पर्यंत होती परंतु या मध्ये १३ वर्ष वाढीसाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता २०५२ पर्यंत टोल वसूली करण्यात येणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -