Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उद्योगपती अदानींच्या अडचणीत वाढ; आता मार्केट नियामक SEBI करणार चौकशी

उद्योगपती अदानींच्या अडचणीत वाढ; आता मार्केट नियामक SEBI करणार चौकशी

Subscribe

उद्योगपती गौतमी अदानी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मार्केट नियामक सेबीने अदानी समूहाच्या परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या काही व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमांचे संभाव्य उल्लंघनाचा शोध घेतला जाणार आहे.

उद्योगपती गौतमी अदानी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मार्केट नियामक सेबीने अदानी समूहाच्या परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या काही व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमांचे संभाव्य उल्लंघनाचा शोध घेतला जाणार आहे. त्यानुसार, आता अदानी समूहाच्या किमान तीन विदेशी कंपन्यांसोबतच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे. तसेच, अदानी समुहाने केलेल्या ‘संबंधित पक्ष व्यवहारां’मध्ये नियमांचे उल्लंघन होत नाही? याची तपासणीही करणार आहे. दरम्यान, या व्यवहारांमध्ये ‘रिलेट पार्टी’ व्यवहाराच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा सेबीला संशय आहे. (hindenburg adani group sebi reportedly probing some adani deals for possible rule violations)

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती गौतम अदानी यांनी स्थापन केलेल्या पोर्ट-टू-पॉवर समूहाच्या असूचीबद्ध युनिट्ससह गेल्या १३१ वर्षांत तीन संस्थांनी अनेक गुंतवणूक व्यवहार केले आहेत. गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानी यांचा देखील या संस्थांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विनोद अदानी एकतर कंपनीचे फायदेशीर मालक, डायरेक्टर किंवा त्यांचा त्यांच्याशी काही संबंध असेल. हे उघड न करणे हे ‘संबंधित पक्ष व्यवहार’ नियमांचे उल्लंघन आहे का, याची तपासणी सेबी करत आहे.

- Advertisement -

दरम्यान, अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड हे विनोद अदानी यांच्या कंपन्यांनी विकत घेतले असल्याचे उघड केले होते. याशिवाय विनोद अदानी हे अदानी ग्रुपच्या प्रमोटर्स ग्रुपचा एक भाग आहेत, असेही अदानी ग्रुपकडून सांगण्यात आले.

भारतीय कायद्यांतर्गत जवळचे नातेवाईक, प्रवर्तक गट आणि सूचीबद्ध कंपन्यांचे उपकंपनी संबंधित पक्ष मानले जातात. प्रवर्तक गटाची व्याख्या एक संस्था म्हणून केली जाते, ज्याचा सूचीबद्ध कंपनीमध्ये बहुसंख्य हिस्सा असतो आणि कंपनीच्या धोरणावर प्रभाव टाकू शकतो. अशा संस्थांमधील व्यवहार नियामक आणि सार्वजनिक फाइलिंगमध्ये उघड केले जाणे आवश्यक आहे आणि एका विनिर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त भागधारकांची मंजुरी देखील आवश्यक आहे. सामान्यतः नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.


- Advertisement -

हेही वाचा – बिहार हिंसाचार : सुरक्षेच्या कारणात्सव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा सासाराममधील कार्यक्रम रद्द

- Advertisment -