घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या निशाण्यावर हिंदू कर्मचारी, हिटलिस्ट जारी

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या निशाण्यावर हिंदू कर्मचारी, हिटलिस्ट जारी

Subscribe

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद 370 उठवल्यानंतर मोठ्या अतिरेकी कारवायांना आळा बसला असला तरी, अतिरेकी संघटना अद्याप सक्रिय आहेतच. त्यांनी तेथील हिंदू तसेच परप्रांतीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यातील काही संघनटांनांनी अशा व्यक्ती हेरण्यास सुरुवात देखील केली असल्याचे उघड झाले आहे.

काश्मीरमध्ये अतिरेकी आणि सरकारी यंत्रणेतील त्यांच्या हस्तकांचे नेटवर्क अजूनही सक्रिय आहे, त्यामुळे सरकारी कागदपत्रे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत आहेत. द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने 56 काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांची यादी जारी केली आहे. या यादीमध्ये संबंधित कर्मचार्‍यांच्या नावासह त्यांच्या जुन्या आणि नवीन ड्युटीच्या ठिकाणांची तपशीलवार माहिती देखील आहे. यातील बहुतेक शिक्षक असून ते श्रीनगरमध्ये आहेत.

- Advertisement -

या हिटलिस्टमुळे घाबरलेल्या काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांनी काश्मीरबाहेर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. दहशतवाद्यांनी दिलेली धमकी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेली कर्मचाऱ्यांची संपूर्ण यादी, याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि सायबर सेलकडे सोपविण्यात आला आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी टीआरएफ काश्मीर खोऱ्यात सक्रिय झाले आहे. याला लष्कर-ए-तैयबाचे हिट स्क्वॉड म्हटले जाते आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेले 99 टक्के अतिरेकी स्थानिक आहेत. 5 ऑगस्ट 2019 नंतर, काश्मीर खोऱ्यात परप्रांतीय ट्रक चालक, कामगार, अल्पसंख्याक तसेच काश्मिरी हिंदूंच्या टार्गेट किलिंगमध्ये टीआरएफचा हात आहे. यातील केवळ एक-दोन घटना अपवाद ठऱतील. इंटरनेट मीडियावर काश्मीर फाईट्स नावाचा ब्लॉक आणि वेबसाइट हे टीआरएफचे मुखपत्र असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

दहशतवादी संघटनेच्या या हिटलिस्टमुळे काश्मिरी हिंदू कर्मचारी आणि अल्पसंख्याकांमध्ये पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने विस्थापित काश्मिरी हिंदू कर्मचारी काश्मीरमध्ये त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी ड्युटी करण्याऐवजी जवळपास सात महिन्यांपासून जम्मूमध्ये आंदोलन करत आहेत. खोऱ्यातील परिस्थिती सुरळीत होईपर्यंत त्यांच्या नियुक्त्या काश्मीरबाहेर सुरक्षित ठिकाणी कराव्यात, अशी या लोकांची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -