घरमुंबईत्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की...; राज ठाकरेंनी दिल्या वहिदाजींना हटके शुभेच्छा

त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की…; राज ठाकरेंनी दिल्या वहिदाजींना हटके शुभेच्छा

Subscribe

देवआनंद यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना प्रतिष्ठीत असा दादासाहेब फाळके पुरस्कार झाला.

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना जाहीर झाला आहे. त्यांचे जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना राजकारणी पण तेवढेच कलारसिक असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत वहिदा रेहमान यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ती पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. (His Hindustani was so sure that Raj Thackeray gave best wishes to Wahidaji)

- Advertisement -

देवआनंद यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना प्रतिष्ठीत असा दादासाहेब फाळके पुरस्कार झाला. त्यानंतर आज 27 सप्टेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत वहिदाजींचे कौतुक करत त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. वहिदा रेहमान या भारतीय सिनेसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. 1956 पासून त्या हिंदी सिनेसृष्टीत आल्या. त्यांनी गुरुदत्त, देवआनंद, राज कपूर, दिलीप कुमार, राज कुमार अशा सगळ्या दिग्गजांसह काम केले आहे. तसेच त्यांची सेकंड इनिंगही यशस्वी ठरली आहे.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीसोबत सैन्यअधिकाऱ्याची पत्नी करत होती असे काही की तुम्ही पण म्हणाल…

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे ट्वीटमध्ये?

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, वहिदा रहमान ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. 1956 ला राज खोसला ह्यांच्या ‘सीआयडी’ (CID) सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास 60 वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिले. पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असे ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, डायरेक्टर जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर ह्या क्षेत्रांत टिकणार असेन तर माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार हे नाही हे सांगणं सोपं नाही, पण ते वहिदाजींना जमलं. असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : अमानुषपणा! उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अर्धनग्न अवस्थेत तासनतास भटकली, पण…

मुस्लिम अडनाव लपवण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत

पुढे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, स्वतःचं मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवलं पण नाही. अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणं ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, अर्थात वहिदाजीच नाहीत तर कुठल्याही कलाकाराला हे पुरस्कार थोडे आधी मिळायला काहीच हरकत नाही. पण असो. असेही राज ठाकरे वहिदा रेहमानबाबत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -