मला कोणताही राजकीय पक्ष अस्पृश्य नाही, टॉप लिडर्स माझ्या संपर्कात – हितेंद्र ठाकूर

Hitendra Thakur has also received a call from the Chief Minister

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत एक मोठे विधान केले आहे. मी महाविकास आघाडीत 100 टक्के खूश नाही, असे ते म्हणाले आहेत. मी सरकारला पाठिंबा दिलाय म्हणून ते वसई विरार महापालिका माझ्यासाठी सोडणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे. मतदानाला अजून आठवडा आहे, खूप उलथापालथ होईल. मला कोणताही राजकीय पक्ष अस्पृश्य नाही. आजचा मित्र उद्याचा विरोधक असू शकतो. महाविकास आघाडी आणि भाजपचे टॉप लिडर्सनी मला संपर्क साधलाय, असेही ते म्हणाले.

टॉप लिडर्स माझ्या संपर्कात –
निवडणूक टाळता येऊ शकते, पण कुणी धरायचे कुणी सोडायचे हा प्रश्न असतो. राजकारणात एक इगो किंवा ईर्षा असते. इगोपोटी निवडणुका आल्याहेत. पण त्यात चुकीचे काय कळेल ना ताकद काय आहे ? लोकसभा, विधानसभा बिनविरोध होऊ शकते का? माझ्या मर्जीचे ते बिनविरोध असे होऊ शकत नाही. प्रत्येकला लोकशाहीत मत मागण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. माझा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष संपर्क साधत आहेत. त्यात काही चुकीचे नाही. सर्व राजकीय पक्षाच्या टॉप लिडर्सनी संपर्क साधला, काही भेटले. काही भेटत आहेत बोलत आहेत, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.

मी कामांना प्राधान्य देतो –
जो आमच्या विभागाच्या कामांना प्राधान्य देतो आम्ही त्यांच्या बरोबर असतो. मग आजी – माजी मुख्यमंत्री का असेनात. महाविकास आघाडीला विशिष्ट कारणांनी पाठिंबा आहे. दोन अडीच वर्षे ज्या पद्धतीने वागणूक दिली. कुणी आपल्या शासनाच्या विरोधात का जातो तर आपल्या विभागात मूलभूत सोयी सुविधांची कामे किती झाली ह्याचे इव्हलयुएशन करून निर्णय घेतला जातो. मी विधानसभेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना बोललो होतो की मी धनंजय मुंडेंना मत दिले. आजपर्यंत आम्ही काँग्रेस, NCP शिवसेना तिसरी आघाडी लोकं बघून मत देत आलोय. वैयक्तिक संबंध आणि शासन आपल्या विभागासाठी काय करते ते पाहिले, असे आता ठाकूर म्हणाले. यावेळी त्यांनी

सर्व नेते माझ्या संपर्कात –
निवडणूक टाळता येऊ शकते, पण कुणी धरायचे कुणी सोडायचे हा प्रश्न असतो. राजकारणात एक इगो किंवा ईर्षा असते. इगोपोटी निवडणुका आल्याहेत. पण त्यात चुकीचे काय कळेल ना ताकद काय आहे ? लोकसभा, विधानसभा बिनविरोध होऊ शकते का ? माझ्या मर्जीचे ते बिनविरोध असे होऊ शकत नाही. प्रत्येकला लोकशाहीत मत मागण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. माझा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष संपर्क साधत आहेत. त्यात काही चुकीचे नाही. सर्व राजकीय पक्षाच्या टॉप लिडर्सनी संपर्क साधला, काही भेटले. काही भेटत आहेत बोलत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी मी व्हीप काढल्या नंतर माझ्या पक्षाचे आमदार मला दाखवून मत देतील. हा घोड्याचा बाजार नेमका भरतो कुठे ? घोडेबाजार का म्हणता ? आमदार बाजार म्हणा ना थेट, असे आव्हान हितेंद्र ठाकूर यांनी दिले