घरमुंबईएड्स पुन्हा डोकं वर काढतोय; HIV रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ११ टक्क्यांनी वाढ

एड्स पुन्हा डोकं वर काढतोय; HIV रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ११ टक्क्यांनी वाढ

Subscribe

गेल्या दोन वर्षांत एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूंमध्ये जवळपास ११ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कायदायक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रासह मुंबईत वारंवार एड्सविषयी होणाऱ्या जनजागृतीमुळे एड्स रुग्णांची संख्या कमी होते आहे. पण, दुसरीकडे एड्समुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. अनेकदा असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्ही होण्याचा धोका टाळता येत नाही. त्यामुळे, आजही होणारी जनजागृती ही ग्रामीण भागात पोहोचत नसल्याचं चित्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही चितेंची बाब आहे. गेल्या दोन वर्षांत एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूंमध्ये जवळपास ११ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कायदायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम’ (एचएमआयएस) या संकेतस्थळावर ही माहिती जाहिर करण्यात आली आहे.

एचआयव्ही रुग्णांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आता मुंबईसह महाराष्ट्रात एचआयव्ही रुग्णांमध्ये घट होताना दिसून येत आहे. पण, ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम’ (एचएमआयएस)च्या आकडेवाडीनुसार, महाराष्ट्रात एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढताना दिसून येत आहे.

- Advertisement -

वर्ष                    राज्यात एचआयव्हीमुळे मृत्यू                             मुंबईत एचआयव्हीमुळे मृत्यू
२०१६ – १७                १,३९०                                                            ७२
२०१७ – १८                १,३६१                                                           १२८
२०१८ – १९                १,५०९                                                           १२८

मुंबई, पुणे, सांगलीत रुग्णांचे मृत्यू 

यावरून महाराष्ट्रात मागील ३ वर्षांत एचआयव्ही असणाऱ्या ४,२६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील ३२८ जणांचा समावेश आहे. २०१८-१९ या वर्षभरात पुण्यात २७० तर, मुंबईत १२८ आणि सांगलीत १०३ जणांचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कमी असलेल्या जनजागृतीमुळे आजही मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आलेलं नाही. २०१९ मध्ये महाराष्ट्रात नोंद केल्या गेलेल्या एचआयव्हीच्या मृत्यूंमध्ये ९४ टक्के मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत. म्हणजेच १५०९ पैकी १४२१ मृत्यू हे ग्रामीण भागात झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती होण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञ डॉक्टर्स व्यक्त करतात.

- Advertisement -

देशातील एचआयव्हीग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा

वर्ष                  मृत्यू
२०१६ – १७       ७,६७२
२०१७ – १८       ८,६७४
२०१८ – १९       ७,९८०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -